आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटावसाठी अखेर मुहूर्त गवसला; पहिल्या टप्प्यात जामनेर रोडचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- येत्या पंधरवड्यात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने आवश्यक नियोजन करून पोलिस संरक्षण मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पोलिस संरक्षण मिळताच १६ एप्रिल किंवा यानंतर अतिक्रमण काढण्यात येईल.
शहरात वाढलेले अतिक्रमण रोखणे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. संकुलांवर पक्के बांधकाम, रस्त्यांवरील हातगाड्या, नाल्यांवरील टपऱ्या अन् दुकाने हे प्रकार त्यात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनीच प्रशासनाला धाब्यावर बसवून बिनदिक्कत अतिक्रमित दुकाने उपलब्ध करून दिली आहेत. याबाबत शहरवासीयांची वाढलेली नाराजी आणि काही सत्ताधारी-विरोधी नगरसेवकांकडून दबाव वाढल्याने पालिका प्रशासन हादरले आहे. यानुषंगाने शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, मुख्याधिकारी भारत राठोड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, डीवायएसपी राेहिदास पवार यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेत अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलिस बंदोबस्त पुरवण्यास सहमती मिळाल्याने पालिकेने उर्वरित नियोजन पूर्ण केले आहे.
पहिल्याटप्प्यात जामनेर रोड
पालिकेने यापूर्वीच 170 अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे. आता पहिल्या टप्प्यात जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज ते नाहाटा चौफुलीदरम्यानचे सर्व अतिक्रमण काढण्यात येईल. यानंतर सर्व प्रमुख रस्ते, पालिकेच्या मालमत्तेवर कोणताही ठराव नसताना अथवा पूर्वपरवानगी घेता झालेल्या बांधकामावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. येत्या १६ एप्रिलपासून साधारणत: आठवडाभर ही कारवाई सुरू राहू शकते.
पालिकेने शहरातील अतिक्रमणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 16 एप्रिलपासून विशेष मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध होणार असून, कोणाचीही गय करता सर्व ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येईल. अख्तरपिंजारी, नगराध्यक्ष,भुसावळ
दिसली जागा, बांधा दुकान : शहरातपालिकेची जागा मोकळी दिसताच, रातोरात टपऱ्या ठेवणारे वाढले आहेत. उद्यानांना अतिक्रमणाचा वेढा असून वाहतुकीच्या रस्त्यांवर दुकाने, लोटगाड्या उभ्या राहतात. हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेला मुहूर्त गवसल्याचे चित्र आहे.
मुताऱ्यातोडून दुकाने: पालिकेच्यासंकुलांमधील मुताऱ्या, डक्ट आणि मीटर रूममध्ये दुकाने थाटली आहेत. व्यापारी संकुलांचे टेरेस भाडेपट्ट्यावर देण्याचे ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करून बांधकाम पाडण्याचे आदेश आहेत. यादृष्टीने हालचाली नाहीत.
हे मार्ग होतील अतिक्रमणमुक्त: जामनेररोड, खडका रोड, तापी रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, बसस्थानक, पालिका कार्यालय परिसर, मॉडर्न रोड, आठवडे बाजार भागांतील अतिक्रमणधारकांना पालिकेने नोटीस बजावली आहे. बंदोबस्त हे अतिक्रमण निघेल.
पालिकेलावाटाण्याच्या अक्षदा : विद्याश्रमस्कूलच्या प्रवेशद्वारावरील अनधिकृत बांधकामाचा पालिकेने शुक्रवारी पंचनामा केला होता. मात्र, यानंतरही काम सुरू आहे. शहरातील एका बड्या नेत्याच्या वरदहस्तानेच काम सुरु असल्याची चर्चा आहे.
रस्ता आणि पालिकेच्या मालमत्तेवरील बांधकामे इतकी वाढली की, आता पायी चालण्यासही जागा नाही. अतिक्रमण काढावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याबाबत सकारात्मक निर्णय होत असल्याने नक्कीच दिलासा मिळेल. निर्मलकोठारी, नगरसेवक,भुसावळ