आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण: विषय समिती सदस्यांची निवड 10 मिनिटांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पालिकेच्या बहुचर्चित विषय समित्यांसह स्थायी समिती सदस्यांची निवड सोमवारी पिठासीन अधिकारी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पालिकेच्या सभागृहात दुपारी 1 वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया अवघ्या 10 मिनिटांत पार पडली.
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने बोलावण्यात आलेल्या या विशेष सभेत प्रभारी मुख्याधिकारी पी. जी. सोनवणे यांनी विषयाचे वाचन केले. नगराध्यक्ष उमेश नेमाडे, उपनगराध्यक्षा नूरजहॉँ खान, राष्ट्रवादीचे गटनेते नईमखॉँ पठाण, उपमुख्याधिकारी आर. डी. साठे हे मंचावर उपस्थित होते. पिठासीन अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार सर्व गटनेत्यांनी आपापल्या गटातील सदस्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसने अपक्षांसह मीना आघाडीच्या सदस्याचे नावही सुचवले आहे. सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य, नियोजन आणि विकास, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा व जलनिस्सारण अशा समित्यांसाठी प्रत्येकी 13 सदस्यांची नावे सुचवण्यात आली आहेत. त्यातून सभापतींची निवड होणार आहे.
विषय समित्यांसाठी राष्ट्रवादीचे गटनेते नईमखॉँ पठाण, भाजपचे अजय भोळे, खान्देश विकास आघाडीचे किरण कोलते यांनी आपल्या गटातील सदस्यांची नावे दिली. सभा शांततेत पार पडावी, यासाठी पालिका सभागृहाच्या बाहेर व प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
सभेला 40 सदस्य उपस्थित
सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी सध्या पत्रकयुद्धामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. मात्र, पालिकेच्या सहा विषय समित्या व स्थायी समितीपैकी त्यांचे नाव फक्त स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक या एकमेव समितीत सुचवण्यात आले आहे. विशेष सभेला 47 पैकी 37 निवडून आलेले व तीन नामनिर्देशित असे 40 सदस्यांची उपस्थिती होती.
>महिला व बालविकास समिती : सारिका पाटील, नंदा निकम, सुशीला अहिरे, सुषमा नेमाडे, जरीनाबी नसीम खान, तर्रनुम इद्रिस, शोभा सपकाळे, शारदा झोपे, वासंती इंगळे, हेमलता इंगळे, भावना पाटील, रेखा सोनवणे, शारदा धांडे.
>नियोजन आणि विकास समिती : अ. जलील कुरेशी, हाजी नईमखाँ सिद्दीकखाँ, उदय मुक्तीप्रसाद सिंह, अख्तर पिंजारी, जाकीर सरदार शेख, नूरजहॉँ खान, विजय चौधरी, शारदा झोपे, वसंत पाटील, रमण भोळे, रमेश नागराणी रेखा सोनवणे, सोनल महाजन.
>स्थायी समिती : जरिया मीनू शिवरतनसिंग, जैबुन्नीसा रोषन शेख, रमेश नागराणी.
>पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : अरुणा सुरवाडे, शोभा सपकाळे, तर्रनुम इद्रिस, इस्माईल अहमद अबुबकर मेमन, जरीनाबी नसीम खान, सुशीला अहिरे, जरिया मीनू शिवरतनसिंग, शोभा नाटकर, प्रमोद नेमाडे, शैलजा नारखेडे, दीपाली बर्‍हाटे, किरण कोलते, प्रकाश बतरा.
>स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य समिती : अ. आरीफ अ. गनी, संतोष चौधरी, पुष्पा चौधरी, कविता चौधरी, जाकीर सरदार शेख, सुशीला अहिरे, तर्रनुम इद्रिस, युवराज लोणारी, अजय भोळे, भावना पाटील, दीपाली बर्‍हाटे, किरण कोलते, प्राध्यापक दिनेश राठी.
>शिक्षण समिती : भीमराज कोळी, संतोष चौधरी, कविता चौधरी, सुषमा नेमाडे, विजय चौधरी, जैबुन्नीसा रोषन शेख, राजेंद्र आवटे, पुष्पा चौधरी, अजय भोळे, शैलजा नारखेडे, शोभा नेमाडे, संगीता मनोज बियाणी आणि शारदा धांडे.
>सार्वजनिक बांधकाम समिती : शेख मुस्ताक मुसा, शोभा नाटकर, अख्तर पिंजारी, जरीनाबी खान, शोभा सपकाळे, विजय चौधरी, जाकीर शेख, निर्मल कोठारी, राहुल मकासरे, प्रमोद नेमाडे, रमण भोळे, मनोहर बारसे, प्राध्यापक दिनेश राठी.