आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळच्या नाहाटा काॅलेजला स्वायत्त दर्जा, उमवितील पहिले महाविद्यालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भुसावळ येथील पी.ओ.नाहाटा या महाविद्यालयाला ‘स्वायत्त महाविद्यालय’ असा दर्जा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वायत्ता मिळवणारे नाहाटा हे पहिले महाविद्यालय ठरले अाहे. जागतिकीकरणाच्या वातावरणात विद्यार्थी उद्योगक्षेत्राच्या मागणीप्रमाणे अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. उलट विद्यापीठीय शिक्षण पद्धती, मूल्यमापन पद्धती कालबाह्य ठरत असून सुशिक्षित बेरोजगार निर्माण करणारे कारखाने या संज्ञेला विद्यापीठे पात्र ठरत आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील या परिस्थितीचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त महाविद्यालयाची योजना मांडली आहे.
स्वायत्तते सदर्भांत कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांत नाहाटा हे स्वायत्त महाविद्यालय म्हणून ओळखले जाईल. चालू शैक्षणिक वर्षात नॅक कमिटीने जिल्ह्यातील बऱ्याच महाविद्यालयांमध्ये तपासणी करून त्यांना गुणांकन जाहीर केले आहे. यात नाहाटा महाविद्यालयाला सलग तीन वर्षे ‘ए ग्रेड’ मिळाली. संपूर्ण राज्यभरात सलग तीन वर्षे ग्रेड मिळवणाऱ्या महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोग राज्य शासनाने स्वायत्तता प्रदान केली आहे. यात खान्देशातील नाहाटा हे एकमेव महाविद्यालय आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तशी यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. नाहाटा महाविद्यालयाची निवड झालेली असल्यामुळे त्यांनी स्वायत्तता मिळवण्याच्या उद्देशाने तसा प्रस्ताव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे पाठवलेला आहे.

फायदे काय असतील
>कालसुसंगतअभ्यासक्रम तयार करण्यासाठी विद्यापीठाच्या मान्यतेची गरज असणार नाही.
>महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम, पदवी/पदविका सुरू करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
>शिक्षण शुल्क निर्धारण समितीकडून फी निश्चिती करून फी ठरवण्याचा अधिकार.
>विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणाऱ्या विविध अनुदानांमध्ये वाढ होते.
>स्वायत्त महाविद्यालयावर विद्यापीठ, यूजीसीचे नियंत्रण असते. विद्यार्थ्यांना पदवी विद्यापीठाची मिळते.

प्राधिकरण नसल्यामुळे उशीर
विद्यापीठअनुदान आयोगाकडून निवड झाल्यानंतर नाहाटा महाविद्यालयाने स्वायत्तता मिळवण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, सध्या विद्यापीठ कायदा अस्तित्वात नसल्यामुळे सर्वच प्राधिकरणे संपुष्टात आलेली आहेत. यामुळे नाहाटा महाविद्यालयाच्या प्रस्तावावर संथगतीने काम सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...