आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- विकासात्मक धोरणावर चर्चा करण्यासाठी आमसभेच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी एकत्र येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून भुसावळ तालुक्याची आमसभाच घेण्यात आलेली नाही.
भुसावळ तालुक्यातील अनेक विकासाचे विषय गेल्या दोन वर्षांपासून शासकीय कार्यालयात खितपत पडलेले आहे. आमसभेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी आमने-सामने येत असल्याने प्रश्नांची सोडवणूक होत असते. पंचायत समितीच्या माध्यमातून होणारी आमसभा ही ग्रामपातळीवरील ग्रामसभेपेक्षा महत्त्वपूर्ण ठरते. दुर्दैवाने मात्र, तालुक्यात सन 2010 पासून आमसभा झालेली नाही. 15 ऑक्टोबर 2010 रोजी आमदार संजय सावकारे, तत्कालीन सभापती राजेंद्र चौधरी आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत सभा झाली होती. त्यात आरोग्य विभाग, बाल विकास प्रकल्प विभाग, कृषी विभाग, वीज वितरण कंपनी, वनविभाग, सहकार विभाग, परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन मार्ग निघाले होते. त्यानंतर मात्र पंचायत समिती प्रशासनाने आमसभा घेण्याबाबत विचारच केला नाही. वर्षातून किमान एकवेळा आमसभा होणे बंधनकारक आहे. प्रशासनाने आता आमसभा घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यंदाच्या मार्चपर्यंत तरी ही सभा होईल की नाही? याबाबत शंका आहे.
माहितीचे संकलन सुरू
आमसभेसाठी लवकरच माहिती तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर आमदार संजय सावकारे यांची वेळ घेतली जाईल. दोन वर्षांपासून आमसभा झाली नसल्याने यावर लवकरच निर्णय होण्यासाठी प्रयत्न आहेत. माहिती संकलित करण्यासाठी मात्र वेळ लागत असल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. आर.पी. तायडे, गटविकास अधिकारी, भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.