आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: राजकीय उदासीनतेमुळे एमआयडीसीतील प्लास्टिक पार्कला मोगरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरातील एमआयडीसीमध्ये १०० एकर जागेवर प्लास्टिक पार्कचे गाजर दाखवण्यात आले. मात्र, किमान वर्षभराचा कालावधी उलटूनही प्रशासकीय स्तरावर प्लास्टीक पार्कची कोणतीही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. यामुळे नियोजीत कामाला मोगरी लागली आहे. निवडणुकांमध्ये आश्वासनांची खैरात वाहणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हा महत्वकांक्षी प्रकल्प रखडला आहे. 
 
घोडसगाव येथील संत मुक्ताई साखर कारखान्याच्या उद््घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ एमआयडीसीमध्ये भव्य इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क उभारण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर टेक्सटाईल पार्क जामनेर येथे हलवण्यात आला. टेक्सटाईल पार्कऐवजी भुसावळात प्लास्टीक पार्क उभारणीचे आश्वासन दिले गेले. गेल्या पालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभांमध्ये एमआडीसीचा विकास आणि नियोजीत प्लास्टीक पार्क हा प्राधान्याचा विष? होता. जाहीर सभांमध्ये तशी आश्वासने दिली गेली. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पाची प्रक्रिया अद्याप तसूभरही पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे या पार्कसाठी एमआयडीसी प्रशासन १०० एकर जागा देण्यासाठी तयार आहे. मात्र, राजकीय अनास्थेमुळे शासनदरबारी या विषयाला पाठबळ नाही. भाषणबाजीतून बेरोजगारीवर चिंता व्यक्त करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या कामासाठी पाठपुरावा करावा, अशी संपूर्ण तालुक्याची अपेक्षा आहे. केवळ प्लास्टिक पार्कच नव्हे भुसावळ एमआयडीसीचा विकास नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शासन उदासीन आहे. 
 
माहितीच उपलब्ध नाही 
नियोजित प्लास्टिक पार्कबाबत जळगाव येथील एमआयडीसीचे अभियंता जी. पी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत आमच्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. धुळे येथील उपविभागीय कार्यालयातून निर्णय प्रक्रिया होईल, असे सांगितले. 
 
अंतर्गत रस्त्यांची चाळण 
एमआयडीसीमधील विस्तारित भागांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, जुन्या भागातील रस्ते शेवटची घटका मोजत आहेत. रस्त्यांची चाळण झाल्याने लघुउद्योजकांना त्रास सहन करावा लागतो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...