आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतिपदासाठी भाजपमध्ये सुरू झाली रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पंचायतसमिती सभापतिपदासाठी भाजपच्या मुरलीधर वना पाटील आणि राजेंद्र पुंडलिक चौधरी यांच्या गटात चुरस निर्माण झाली आहे. त्यातच पाटील गटाने चार सदस्यांना सहलीसाठी पाठवल्याने भाजपला सुद्धा अंतर्गत गटबाजी लागण झाल्याचे उघड झाले आहे.
भुसावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. सभापती मंगला झोपे, उपसभापती शेख खलील शे. गनी, अलका पारधी, संतोष निसाळकर, राजेंद्र पुंडलिक चौधरी हे पाच राष्ट्रवादी, तर मुरलीधर पाटील, मनीषा पाटील आणि विजया नरेंद्र मोरे हे तीन भाजपचे सदस्य होते. आमदार संजय सावकारे यांनी आपल्या पाचही समर्थकांसह राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व चौण झाले. पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खडका गणातून निवडून आलेले मुरलीधर पाटील आणि हतनूर गणातून निवडून आलेले राजेंद्र पुंडलिक चौधरी यांनी फिल्डिंग लावली आहे.
जोरदार मोर्चेबांधणी
अद्यापसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी मुरलीधर पाटील यांचे बंधू सागर पाटील यांनी चार सदस्यांना अज्ञातस्थळी सहलीसाठी रवाना केल्याची माहिती समोर आली आहे. चारही सदस्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे एका जबाबदार पदाधिकाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले. परिणामी या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

एक पक्ष, चार वेगवेगळे गट
भुसावळपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीतून आलेल्यांना तिकीट वाटपात प्राधान्य मिळाले. यामुळे शहर भाजपमध्ये आधीच दोन गट पडले होते. त्यातच लोकसभा निवडणुकीपूर्वी अनिल चौधरींनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या समर्थकांचा तिसरा गट तयार झाला. या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत संजय सावकारेंच्या प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांचा चौथा गट निर्माण झाला आहे.
चौधरींचा गट गारद
अनिल चौधरींनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र चौधरी आणि त्यांचा गट प्रचारापासून दूर राहिला. आता पंचायत समिती सभापती निवड प्रक्रियेत हा गट गारद आहे. गटबाजी असली तरी वरिष्ठ नेते तथा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लक्ष घातल्यास हा ितढा सुटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अनिल चौधरींचा गट वगळता भाजपमधील सर्वच गट महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि आमदार संजय सावकारेंना मानणारा आहे. आता दोन्ही नेते काय भूमिका घेतात? यावर आगामी काळातील सभापती ठरणार आहे. सव्वा-सव्वा वर्षाची तडजोड करून या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.