आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal PRP Allegation On Opposition Leader Eknath Khadse

विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे, पालकमंत्री संजय सावकारे छुपी युती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शासन दरबारी गेल्या चार वर्षांपासून वरणगाव नगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी हालचाली गतिमान आहेत. मात्र, राजपत्र उद्घोषणा होऊनही काम रखडले आहे. पालकमंत्री संजय सावकारे आणि विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांच्यात छुपी युती असल्याने वरणगाव पालिकेचा विषय रखडला आहे, असा आरोप पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी केला आहे.

वरणगावला नगरपालिका लवकरात लवकर अस्तित्वात यावी, यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी वरणगाव बसस्थानकासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना हा आरोप केला. सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्र्यांचे जिल्ह्यात वजन पडत नाही. वरणगावात तर समस्याच समस्या आहेत. पालिकेच्या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी 21 ऑक्टोबर रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयावर 30 ऑक्टोबर रोजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करतील, असा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे. याकडे राष्ट्रवादी काँग्रेससह परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.

आरोप निराधार
वरणगाव नगरपालिका अस्तित्वात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. भविष्यात र्शेय मिळावे, यासाठी सुरू असलेला हा खटाटोप आहे. आरोप निराधार आहेत. संजय सावकारे, पालकमंत्री