आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आढावा: तिकीट विक्रीत भुसावळ अव्वल; आता दिवाळीची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- गेल्यावर्षी सरासरी 32 टक्के उत्पन्न वाढ नोंदवणारा मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग यंदाही अव्वल क्रमांकाच्या दिशेने आगेकूच करीत आहे. सन 2012-2013 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीशी तुलना करता एकट्या भुसावळ स्थानकावर आरक्षित तिकिटातून विभागाला 44 लाख रुपये जास्तीचे उत्पन्न मिळाले आहे.

रेल्वे बजेटमध्ये भुसावळ विभागावर वारंवार अन्याय होत असला तरी प्रवाशांचे रेल्वेवरील प्रेम अजिबात कमी झालेले नाही. तिकीट विक्री, माल वाहतूक, पार्सल सेवा आणि अन्य स्त्रोतांमधून रेल्वेला उत्पन्न मिळते. सन 2012-2013 वर्षात मध्य रेल्वेला 1101 कोटी 45 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यापैकी तिकीट विक्रीतून वर्षभरात मिळालेली रक्कम 442 कोटी 59 लाख रुपये होती. संपलेल्या या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल ते जून) विभागाला तिकीट विक्रीतून 3 कोटी 40 लाख 50 हजार 289 रुपये उत्पन्न मिळाले होते. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसोबत तुलना करता हा आकडा 3 कोटी 84 लाख 56 हजार 306 रूपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच तिकिटातून मिळणारे उत्पन्न तब्बल 44 लाखाने वाढले.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उन्हाळी सुटीचा समावेश असतो. पर्यटनाला जाणारे आणि सुटी संपवून पुन्हा गावाकडे परतणारे प्रवासी वाढतात. याच कालावधीत लग्नसराई असल्याने गाड्यांना खच्चून गर्दी असते. या मुळे भुसावळ तिकीट विक्रीतून रेल्वेचे उत्पन्न वाढले आहे.
3 उन्हाळी सुट्यांप्रमाणेच दिवाळीमध्ये रेल्वे गाड्यांना खच्चून गर्दी असते. आर्थिक वर्षाची पहिली आणि तिसर्‍या तिमाहीमध्ये तिकीट विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते.

रविवारी सुरू असते आरक्षण खिडकी
भुसावळ रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकीवर गर्दीमुळे अनेकवेळा वाद होतात. तत्काळ खिडकीबाबतही तक्रारी असतात. आरक्षित तिकीट मिळवताना प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने रविवारी दिवसभर एक आरक्षण खिडकी सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली आहे. ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणार्‍यांसाठी ही सुविधा लाभदायक ठरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तीन वर्षांचा विभागाचा आढावा असा
वर्ष आरक्षण अर्ज प्रवासी संख्या उत्पन्न (कोटी)
2010 3,77,794 6,64,732 127,69,1201
2011 3,89,918 6,85,606 136,33,3749
2012 3,78,532 6,36,868 141,83,1162

आरक्षण खिडकीवरील तिकीट विक्री सन 2012
महिना अर्ज संख्या प्रवासी उत्पन्न (कोटी)
एप्रिल 31,519 56,744 10,93,3880
मे 34,264 57,598 11,86,0338
जून 30,552 51,996 11,25,6071

आरक्षण खिडकीवरील तिकीट विक्री सन 2013
महिना अर्ज संख्या प्रवासी उत्पन्न (कोटी)
एप्रिल 34,042 59,424 12,21,8242
मे 36,807 63,045 14,02,2714
जून 33,251 54,110 12,21,5350


आरक्षणातील गैरसोय टाळण्यावर भर
केवळ भुसावळच नव्हे, तर विभागातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीवर प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतो. भुसावळ स्थानकावर आता रविवारी दुसर्‍या शिप्टमध्ये सुद्धा आरक्षणाची एक खिडकी सुरू ठेवतो.
-एन.जी.बोरीकर, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ विभाग, मध्य रेल्वे