आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- मोबाइल रिचार्जसाठी गेल्यावर हरिओम मोबाइल दुकानचालकाने जातीवाचक शिवीगाळ केली, या आरोपावरून नगरसेवक निक्की बतरासह चार जणांविरुद्ध मंगळवारी अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला. तर दुसरीकडे सिंधी व्यापार्यांच्या दुकानात तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींना मंगळवारी तीन दिवस (24 जानेवारीपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश अ.मा.पाटणकर यांनी दिले. तर एका अल्पवयीन संशयिताची जळगाव बालन्यायालयात रवानगी करण्यात आली.
प्रमोद गोपाळ खरारे याने रविवारी हरिओम मोबाइल दुकानावर गेल्यावर 100 रुपयांची नोट देऊन 30 रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले. यावरून वाद होत दुकानदाराने जातीवाचक शिवीगाळ केली. दुकानातील दुसर्या एका मुलाने लोखंडी रॉडने मारहाण केली. तर नगरसेवक निक्की बतरा आणि विजय मोहनानी यांनी चिथावणी देत शिवीगाळ केल्याचे खरारे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून वरील चौघांविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. यामुळे शहरातील व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे तपास करीत आहे. दरम्यान, मंगळवारी शहरातील बहुतांश दुकाने बंद असतात. तरीही दक्षता म्हणून पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली. डीवायएसपी पानसरे, निरीक्षक प्रभाकर रायते स्वत: शहरात गस्त घालत होते. शहरातील संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
तत्पूर्वी, रविवारच्या तोडफोडप्रकरणी संजय दोधानी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डिगंबर खरारे, हिरामण उर्फ गोजोर्या जाधव व रमेश ढिक्याव यांच्यासह मंगळवारी अटक केलेल्या शंकर शिवचरण चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक ए.ए.पटेल व सरकारी वकील नितीन खरे यांनी पोलिसांची बाजू मांडली. सुनावनीअंती न्यायालयाने अटकेत असलेल्या चार आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
अफवांवर विश्वास ठेवू नये
शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता दैनंदिन व्यवहार पूर्ववत ठेवावे. आम्ही कोणत्याही गुन्हेगारांची गय करणार नाही. विवेक पानसरे, उपअधीक्षक, भुसावळ विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.