आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळच्या जवानाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ/ जळगाव - महिनाभराच्या सुटीवर घरी भुसावळात आलेल्या सेना पोलिस दलातील जवानाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी जळगावात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील भिरूड कॉलनीतील रहिवासी हरीशकुमार मुरलीधर बऱ्हाटे (वय ४९) हे भीमापूर (जि. गुवाहाटी, आसाम) येथे सेना पोलिस (आर्मी पोलिस) दलात हवालदार पदावर सेवारत होते. एक महिन्याची सुटी घेऊन ते १० सप्टेंबरला घरी आले होते. घरी आल्यावर त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवला. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, प्रतिसाद मिळाल्या नेत्यांना शुक्रवारी (दि.१८) जळगाव येथील इंडो-अमेरिकन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रक्ताची चाचणी केल्यावर त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. उपचारादरम्यानच सोमवारी रात्री वाजता त्यांचे निधन झाले. बऱ्हाटे यांच्या पश्चात आई, पत्नी दोन मुले असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी तापी नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भुसावळ मिलीटरी स्टेशनमधील जवानांनी त्यांना पुष्पचक्र अर्णण करुन मानवंदना दिली.

अंत्यविधीवेळी पदोन्नतीचा निरोप
सुटीघेऊन बऱ्हाटे घरी आले होते. यादरम्यान त्यांच्या पदोन्नतीची प्रक्रियादेखील सुरू होती. मात्र, स्वाइन फ्लूचे उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री काळाने त्यांना गाठले. मंगळवारी सकाळी त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना आसाममधील मुख्यालयातून बऱ्हाटे यांच्या भ्रमणध्वनीवर हवालदार पदावरून त्यांची सुभेदार पदावर पदोन्नती झाल्याचा निरोप आला.