आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ : वादळी पावसाचा फटका; 27 ठिकाणी विजेचे तार तुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कडूनिंबाचे भलेमोठे झाड कोसळ्याने पालिकेची ब्रिटिशकालीन भिंत पडली, त्यामुळे नुकसान झाले. - Divya Marathi
कडूनिंबाचे भलेमोठे झाड कोसळ्याने पालिकेची ब्रिटिशकालीन भिंत पडली, त्यामुळे नुकसान झाले.
भुसावळ : सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका महावितरण कंपनीला बसला. वादळी वाऱ्याने शहरातील बहुतांश भागातील वृक्ष उन्मळून विजतारांवर पडल्याने तसेच वादळामुळे २७ ठिकाणी वीजतारा तुटल्या. तर शहरातील सात ठिकाणी विज पुरवठ्याचे खांब वाकल्याने शहरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. मुख्य लाईनवरील पुरवठा मध्यरात्री पावणेदोन वाजता तर उर्वरित भागातील विजपुरवठा मंगळवारी दुपारी सुरळीत झाला. 
 
शहरात सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान वादळी पावसामुळे दाणादाण उडाली. वादळामुळे शहरातील सर्व भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शहरातील जामनेररोडचा परिसर, सहकारनगर, सोमाणी गार्डन, ओंकारेश्वर मंदिर, शासकिय विश्रामगृह, शहर पोलिस ठाणे परिसरासह तब्बल १८ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. महावितरण कंपनीच्या एलटी लाइनवर तब्बल २५ तर एचटी लाइनवर दोन अशा २७ ठिकाणी विजतारा तुटून पडल्या. महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व कामांमध्ये ट्री कटींग केली असली तरी वादळामुळे वृक्षच उन्मळून पडल्याने वीजतारा तुटण्याचे प्रमाण वाढले. शहरात तब्बल सात ठिकाणी विजखांब वाकले. यामुळे रात्री नऊ वाजता वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच वितरण व्यवस्था सुरु करण्यात यश मिळवले.
 
खडकारोडवरील मुस्लीमबहुल भागात रात्री साडेदहा वाजता विजपुरवठा सुरळीत करण्यता आला तर मुख्य लाईनवरील सर्व पुरवठा रात्री वाजून ४० मिनिटांनी सुरळीत झाला. यासह एलटी लाइनवरील अंतर्गत भागातील विजपुरवठा मंगळवारी दुपारी कार्यान्वित झाला. वृक्ष उन्मळून विजतारांचे नुकसान झालेल्या तसेच विजपोल वाकलेल्या सर्व भागांमधील नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. 
 
कमी वेळेत दुरुस्तीचे काम केले पूर्ण 
सोमवारी मध्यरात्रीच अथक परिश्रम घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वृक्ष उन्मळून पडलेल्या ठिकाणी मंगळवारी दुपारपर्यंत दुरुस्ती पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत केला. व्ही.डी. नवघरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण 
 
भिंत कोसळली 
पालिकेतील मोठा वृक्ष उन्मळून गार्ड लाइनकडील भिंतीवर कोसळल्याने भिंत पडली. सध्या पालिकेच्या जीर्ण इमारतीचा मुद्दा गाजत असतानाच भिंत कोसळल्याने गांभीर्य वाढले आहे. 
 
विभागात २६ पोल वाकले 
जामनेर,पहूर, भुसावळ ग्रामीण आणि शहर या भागात तब्बल २६ खांब वाकले, तर ४० ठिकाणी वीज तारा तुटल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमातून रात्रीच हे काम पूर्ण केले. दुरुस्तीचे काम सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता ए. एल. आलेगावकर यांनी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...