आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळच्या कामगारांनी दिल्लीत केले उपोषण, शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी दिला पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- आयुध निमाणी कर्मचारी महासंघातर्फे (एआयडीईएफ) दिल्लीतील जंतरमंतरवर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणात गुरुवारी भुसावळ आयुध निर्माणीतील कामगारांनी सहभाग नोंदवला. आयुध निर्माणी चांदा उत्तर प्रदेशातील कोरवा फॅक्टरीतील कामगारांसोबत उपोषण करून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला.
 
आयुध निर्माणी कर्मचारी महासंघ संलग्न युनियनतर्फे जंतरमंतरवर ३२ दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. गुरुवारी भुसावळ आयुध रामटेक येथील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी हा मुद्दा लोकसभेत मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एआयडीईएफचे अध्यक्ष पाठक जनरल सेक्रेटरी सी. श्रीकुमार महासंघाचे संयुक्त सचिव राजेंद्र झा यांनी १८२ प्रकारचे उत्पादन नॉन कोअरमध्ये टाकण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. खासगीकरणाचा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरु राहणार आहे. भुसावळातील कामगार युनियनचे सचिव दिनेश राजगिरे, किशोर बढे, दिपक भिडे, राजकिरण निकम, दीपक वाघ, पंकज बडगुजर, राजू तडवी, पंकज सोनार, शरद गुप्ता, प्रविण मोरे, गिरीष येवले, रितेश तायडे, गोपाळ सुरडकर, प्रविण पाटील, गोलू वायकोळे, जितू आंबोडकर, महेंद्र पाटील उपस्थित होते.
 
बातम्या आणखी आहेत...