आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी अनिल जगताप यांची बदली झाल्यानंतर आणि त्यांची बदली होण्यापूर्वीही पालिकेत कायम स्वरुपी मुख्याधिकार्यांची वानवाच आहे. प्रभारी अधिकार्यांमुळे पालिकेच्या कार्यालयीन कामावर परिणाम होत असून शहराचा विकास खुंटला आहे.
पालिकेच्या आस्थापनेवर 735 कर्मचारी कार्यरत असताना प्रत्यक्षात 472 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही 20 कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्या मुख्याधिकार्यांचेच पद प्रभारी आहे.
पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी बदलीसाठी प्रयत्न करत दोन महिन्यांची रजा टाकली होती. या काळात तत्कालीन जिल्हा प्रकल्पाधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहिले. नंतरच्या काळात जगताप यांची बदली झाली. त्यांच्याजागी पिंप्री-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त 0000 कारचे यांची भुसावळला नियुक्ती झाली . मात्र, कारचे यांनी पालिकेचा पदभार स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. यानंतर कामकाजाचा गाडा व्यवस्थित चालावा, म्हणून जिल्हाधिकार्यांनी यावलचे मुख्याधिकारी पी. जी. सोनवणे यांची भुसावळला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली. सोनवणे केवळ आठवड्यातील दोनच दिवस भुसावळ पालिकेसाठी देतात. त्यांची काम करण्याची पद्धत सुयोग्य असली तरी स्थानिक राजकारण आणि कुरघोड्यांमुळे त्यांच्या काळातही ठोस निर्णय झालेले नाहीत. सध्या पालिकेच्या बहुतांश विभागाचा कारभार प्रभारी असल्याने विकासाची गती मंदावली आहे.
नियंत्रण कोणाचे ?
पालिकेतील प्रशासकीय कामकाजावर प्रभारी मुख्याधिकारी पूर्ण क्षमतेने लक्ष पुरवू शकत नाहीत. सत्ताधारी आणि नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचेही कर्मचार्यांवर नियंत्रण नाही. या मुळे शहरातील स्वच्छतेसारख्या किरकोळ प्रo्नानेही गंभीर स्वरूप धारण केले आहे. ‘दबंग’ प्रशासकीय अधिकारी रुजू झाल्यास कर्मचार्यांना शिस्त लागेल. अपूर्ण मनुष्यबळातही योग्य नियोजन झाल्यास शहरातील अनेक प्रo्न मार्गी लागतील.
कायम ‘सीओ’ आवश्यकच
पालिकेच्या माध्यमातून शहराच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. प्रशासकीय कामावर लक्ष ठेवण्यासाठी कायम स्वरुपी मुख्याधिकारी आवश्यक आहे. मात्र, जगताप यांच्यानंतर कोणीही मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.