आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Leaders Sidetracked, New Face Will Get New Opportunity

बडे राजकारणी साइडट्रॅक; नव्या चेह-यांना मिळणार संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - एेन निवडणुकीच्या काळात बड्या राजकीय नेत्यांना जिल्हा बँकेची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याची अाठवण झाली अाहे. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी रिंगणाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला अाहे. दुस-या पिढीसाठी मार्ग माेकळा करण्याचा हा प्रकार असला तरी जाणूनबुजूनच ही मंडळी रिंगणाबाहेर राहणार अाहे, असे चित्र दिसते. जिल्हा बँकेतील काही प्रकरणांचा तपास गुन्हे अन्वेेषण विभागाने हाती घेतला अाहे. त्याची सूत्रे मुंबईवरून फिरताहेत. त्यामुळे पुढील काळात कुठलीही कटकट नकाे, म्हणूनच हा मार्ग स्वीकारला गेल्याचे दिसते. राजवर्धन कदमबांडे, अमरिश पटेल, सुभाष देवरे यांच्यासारख्या बलाढ्यांचे प्रस्ताव यंदा अालेले नाहीत.

पाच वर्षांपूर्वी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविराेध झाली हाेती. त्या वेळी काॅंग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व हाेते. राज्यातही याच पक्षांची सत्ता हाेती. त्यामुळे या दाेन्ही पक्षांचे प्रत्येकी पाच सहा तर भाजपचे तीन शिवसेनेचे दाेन सदस्य हाेते. राष्ट्रवादीच्या राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा अाली. अमरिश पटेल, जयकुमार रावल या अामदारांसह चंद्रकांत रघुवंशी, सुभाष देवरे, मधुकर गर्दे, श्यामकांत सनेर, गाेपाळ केले, मंगला पाटील अादी बरेच बलाढ्य संचालक मंडळात हाेते. मात्र, याच मंडळाच्या काळात बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध अाणले. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त केले. त्यामुळे बँकेची प्रतिमा डागाळली. ती सुधारण्याची काेणतीही संधी त्यानंतरच्या तीन वर्षांत मिळालेली नाही. इनमीन दाेन वर्षांचा कार्यकाळ या संचालकांना मिळाला. तरीही त्यापैकी ब-याच जणांनी बँकेबाहेर राहण्याचा निर्णय घेतला अाहे.

ताकही पिताहेत फुंकून
सध्याच्याकाळात अमरिश पटेल अामदार अाहेत. त्यांच्याविराेधात अामदार अनिल गाेटे यांनी बँकेतील पैसे निवडणुकीत वापरल्याचा अाराेप केला अाहे. त्यामुळे अमरिश पटेल यांच्याएेवजी प्रभाकर चव्हाण अाघाडीवर राहू शकतात. राजवर्धन कदमबांडे हे मधल्या काळात चेअरमन हाेते. त्या वेळच्या काही प्रकरणांची चाैकशी सुरू अाहे. त्यामुळे कदमबांडेही फुंकूनच ताक पीत अाहेत. त्यांच्याएेवजी प्रियदर्शन कदमबांडे यांचा अर्ज दाखल झाला अाहे. त्यांचे भाचे सत्यजित सिसाेदे यांनाही पुढे केले जाईल.

कोतेकर, पाटील चर्चेत
राष्ट्रवादीतूनकिरण पाटील किरण शिंदे हे पुढे असतील. मधुकर गर्देंना जवाहर गटाने सभापतिपद दिले अाहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला तरी त्यांचे भाऊ भगवान गर्दे यांना पुढे केले जाईल. जवाहर गटाचे गुलाब काेतेकर, दिनकर पाटील यांचीही नावे पुढे असतील. सुभाष देवरेंएेवजी त्यांचे चिरंजीव विलास देवरे यांना उतरवण्याची तयारी झाली अाहे. श्यामकांत सनेर यांना सध्या पर्याय नाही. तर शिवाजी दहिते बॅकफूटवर असल्यामुळे त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांचा क्रमांक लागणार अाहे.

नंदुरबारमधून काेण याकडे आता सर्वांचे लागलेय लक्ष
नंदुरबारमधूनचंद्रकांत रघुवंशी थेट रिंगणात उतरणार नाहीत. त्यांच्याएेवजी दाेन नावे पुढे अाली अाहेत. मात्र, अद्याप त्यांचे चित्र स्पष्ट झालेले नाही. नवापूरमधून सुरूपसिंग नाईक माणिकराव गावित यांच्या मुलांनाच पुढे केले जाणार अाहे. त्यामुळे सध्यातरी तिथे अगदीच काही पर्याय अाहेत. अामदार विजयकुमार गावित यांनाही जिल्हा बंॅकेचे वेध लागले अाहे.