आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात अडीच लाखांचा मद्यसाठा जप्त; दिवसभर छापासत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात अवैध दारूची विक्री माेठ्या प्रमाणात वाढली अाहे. एकाच दिवसात पोलिसांनी दोन ठिकाणी छापे मारून अडीच लाखांचा मद्यसाठा तसेच वाहने जप्त केली. हायवेवरील बंदीनंतर बनावट मद्याची तस्करीही वाढली अाहे. ९० दिवसांत पाेलिसांनी तब्बल ४२ वेळा कारवाई केली. यात ३७ वाहनांसह दीड काेटीची दारू जप्त करण्यात अाली अाहे. शहर परिसरात अवैध दारूप्रकरणी दरराेज एक तरी कारवाई हाेत अाहे; परंतु पाेलिसांची कटकट यामुळे वाढली अाहे, तर उत्पादन शुल्क विभाग मात्र कुठलीही कारवाई करताना दिसत नाही.
 
शहर परिसरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. यावरील ३२६पैकी २६० अाणि धुळे शहरातील ६४पैकी ६० मद्यविक्रीची दुकाने बंद झाली. त्यामुळे अवैध मद्याचा साठा विक्रीही वाढली अाहे. शहरात चाळीसगाव राेड पाेलिस ठाण्यासह अाझादनगर पाेलिसांनी गेल्या अाठवड्यापासून तीनदा कारवाई केली अाहे. मंगळवारी सकाळी चाळीसगाव राेड चाैफुलीकडे जाणारी सिल्व्हर रंगाची मारुती व्हॅन (क्र.एमएच-१८/डब्ल्यू-३७३२) पाेलिसांच्या पथकाने सूर्या जिमजवळ पकडली. या व्हॅनमध्ये राॅयल स्टॅगचे ४८ नग (१८० मिमीच्या क्वार्टर), इम्पेरियल ब्ल्यूचे ४८ नग (१८० मिमीच्या क्वार्टर), नाॅकअाऊट बिअरचे २२ नग टॅंगाे पंचचे १६ नग असा एकूण २३ हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल अाढळून अाला, तर लाख १० हजार रुपये व्हॅनची किंमत लावण्यात अाली अाहे. याबाबत पाेलिस काॅन्स्टेबल प्रेमराज विक्रम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून राकेश मराठेविरुद्ध चाळीसगाव पाेलिस स्टेशनमध्ये मुंबई प्राेव्हि. अॅक्ट कलम ६५ (ई)नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला. शहरात हा मद्यसाठा अाणला जाताे. यातील बहुतांश मद्याच्या बाटल्यांवर कंपन्यांचे लेबल चिकटविलेले असते. मात्र, त्यातील माल बनावट असताे, असे पाेलिसांचे मत अाहे. हा मद्यसाठा वाहतूक करण्यासाठी खासगी कारचा अधिक वापर केला जात अाहे.

पाेलिसांनी तीन महिन्यांत ४२पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई करीत लाखाेंचा मुद्देमाल जप्त केला अाहे. त्यातील बहुतांश माल बनावट अाहे. ‘डी’ माल म्हणूनच त्याची विक्री हाेत असली तरी, दुकाने बंद झाल्याने त्यासाठीही अनेकदा जादा किंमत माेजावी लागली. या कारवायांमध्ये धुळे शहरातील सागर बार, पाराेळा राेडवरील पशुचिकित्सालयाशेजारी बडगुजर प्लाॅटमधील भावसारबंधूंचा मद्यनिर्मितीचा गृहाेद्याेग, ट्रक टर्मिनल देवपुरातील हाॅटेल त्रिदेव या ठळक कारवायांचा उल्लेख करता येईल.
 
वाहनांचावापर वाढला; विविध प्रकारची वाहने
मद्याच्यावाहतुकीसाठी वाहनांचा वापर गेल्या तीन महिन्यांत वाढल्याचे पाेलिसांच्या कारवायांवरून दिसून येते. शहरासह जिल्हाभरात ३७ वाहने पाेलिसांनी जप्त केली अाहेत. त्यात रिक्षा, इंडिका, बाेलेराे, मारुती व्हॅन अादी वाहनांसह स्काेडासारख्या किमती गाड्यांचा समावेश अाहे. दाेन दिवसांपूर्वीच चाळीसगाव राेडवर माजी नगरसेवकाच्या गाडीतून मद्यसाठा जप्त करण्यात अाला हाेता, तर १५ मे राेजी मनपाच्या ट्रक टर्मिनलमधून ४५ हजारांचा मद्यसाठा जप्त केला गेला. तसेच पिंपळनेर पाेलिस स्टेशन अाणि अाझादनगरसह एलसीबीकडून मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सर्वाधिक वेळा कारवाई करण्यात अाली अाहे. शहर पाेलिसांनी शहरातील बार, खासगी व्यक्ती तालुका पाेलिसांनी नेर येथे हाॅटेलच्या खाली असलेल्या गाेदामातून दीड लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला हाेता. यासह शिंदखेडा तालुक्यात मेथी येथील कपाट कारखान्यातूनही मद्यसाठा जप्त करण्यात अाला हाेता.
 
दीडशेहून अधिक हातभट‌्ट्या उद‌्ध्वस्त
पाेलिसअधीक्षकांच्या अादेशानुसार प्रत्येक पाेलिस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या गावठी हातभट्ट्यांवर कारवाई केली जात अाहे. बंदीच्या निर्णयानुसार जिल्हाभरात चाैदा पाेलिस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या दीडशेहून अधिक हातभट्ट्या उद‌्ध्वस्त करण्यात अाल्या अाहेत. त्या ठिकाणीही मद्यनिर्मितीसाठी लागणारे रसायन, काळा गूळ इतर साहित्य नष्ट करण्यात अाले. अनेक ठिकाणी मात्र अाराेपी पाेलिसांना अाढळून अाले नाहीत; परंतु गावांतील हातभट्ट्या उद‌्ध्वस्त झाल्यात. यात चिताेड येथे दाेन माेठ्या हातभट‌्ट्या नरडाणा येथे सात हातभट्ट्यांवर माेठी कारवाई पाेलिसांकडून केली गेली. गावठी दारू वाहतुकीसाठी प्रामुख्याने वाहनांच्या टायरचा वापर हाेत असल्याचे कारवायांतून पुढे अाले.
 
‘एक्साइज’चे मात्र दुर्लक्ष...
पाेलिसांनीतीन महिन्यांत कारवाई करीत लाखाे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध मद्यविक्री वाहतुकीकडे दुर्लक्ष हाेत आहे. अपवाद वगळता या विभागाने गेल्या तीन महिन्यांत कुठेही कारवाई केल्याचे एेकण्यात अालेले नाही. अार्णी येथे मद्यसाठा बभळाज येथे स्पिरिटचा टँकर पकडण्याशिवाय काेणतीही ठाेस कारवाई या विभागाकडून तीन महिन्यांत केली गेलेली नाही. त्यामुळे हा विभाग नेमका काय करताे? हा प्रश्न अाहे. तसेच बंद झालेल्या मद्यविक्रीच्या दुकानांपैकी ४० विक्रेत्यांनी स्थलांतरासाठी अर्ज केला आहे.
 
२० हजारांचा मद्यसाठा जप्त
साक्रीराेडवरील सिंचनभवनामागे झाडाझुडपांत छुप्या पद्धतीने मद्यविक्री केली जात हाेती. या ठिकाणी शहर पाेिलसांनी छापा मारून केलेल्या कारवाईत २० हजार २५० रुपये िकमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात अाला. या कारवाईदरम्यान तेथे एक जण गावठी दारू बाळगून त्याची विक्री करताना अाढळून अाले. त्याचे नाव निशांत श्यामराव विधाते (रा.यशवंतनगर) असे अाहे. त्याच्याकडून एक दाेनशे लिटर क्षमतेचा प्लास्टिकचा ड्रम, मालट्रकच्या ट्यूब प्लास्टिक कॅनमध्ये असलेली ४०५ लिटर गावठी दारू जप्त केली.
 
माेठ्या कारवाया
स्काेडा वाहन ४५ हजार रुपये
बाेलेराेवाहन ४२ हजार रुपये
हाॅटेलसागर ७० हजार रुपये
नेरचे हाॅटेल गाेदाम दीड लाख रुपये
हाॅटेलित्रदेव ३३ हजार रुपये
बातम्या आणखी आहेत...