आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकल चोरीची चित्तरकथा, साडेपाच वर्षांनंतर सापडली दुचाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नवीपेठेतून चोरीला गेलेली दुचाकी साडेपाच वर्षांनंतर सापडली. तसेच चोरही सापडला. मात्र, पोलिस ठाण्यात नोंद नसल्यामुळे आता सापडलेली दुचाकी मूळ मालकाला देण्यासाठी पोलिसांना दमछाक करावी लागत आहे. दुचाकी चोरीस गेल्यानंतर लागलीच गुन्हा दाखल करून घेतल्यामुळे हा प्रकार घडला आहे. यात चोरट्यालाही संरक्षण दिले.
नवीपेठेतील एका प्रतिष्ठित व्यक्तीची दुचाकी २२ फेब्रुवारी २०१० रोजी चोरीस गेली. त्याने तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, नेहमीप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेता काही दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत तब्बल साडेपाच वर्ष लोटले गेले. दरम्यान, ही दुचाकी चार दिवसांपूर्वी जिल्हापेठ पोलिसांना बेवारस स्थितीत आढळून आल्याची माहिती दुचाकीच्या मूळ मालकाला शहर ठाण्याच्या पोलिसांनी दिली. त्यांनी तत्काळ दुचाकी चोरालाही पकडून आणले. यातून जे साडेपाच वर्षांत झाले नाही, ते दोनच दिवसांत कसे घडले? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, दुचाकी चोरटा मालकाला दाखवला असून चोरीचा सर्व प्रकार समोर आला आहे. ही दुचाकी जिल्हापेठ पोलिसांना मिळून आली, असे शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून ती दुचाकी जो मुलगा वापरत होता, त्याला शहर पाेलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल नव्हता. आता पुढे काय करावे? हे कळत नसल्यामुळे मूळ मालकाने फिर्याद द्यावी, असे ठरले. एवढ्या उशिरा फिर्याद घेणे चुकीचे ठरेल म्हणून तो पर्याय नंतर रद्द केला. अखेर ती दुचाकी चोरीस गेली नसून संबंधितास वापरण्यासाठी दिल्याचा जबाब मूळ मालकाकडून लिहून घेतल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. वेळेवर फिर्याद घेतल्यामुळे पोलिसांनी ही वेगळीच शक्कल लढवली. पोलिसांचा तपास, दैनंदिन कामांतील त्रुटी समोर येऊ नये, म्हणून थेट चोरट्याला सोडून दिले. हा प्रकार ऐकून पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करताे.

गुन्हादाखल करून घेणे बेजबाबदारपण
चोरट्यानेमालकाचीच दुचाकी चोरून नेली. त्यानंतर त्याने महिनाभरात काम सोडले होते. दुचाकीची नंबर प्लेट बदलवून त्याने साडेपाच वर्षे दुचाकी वापरली. दरम्यानच्या काळात या दुचाकीचा वापर करून कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला असता, तर त्याची जबाबदारी दुचाकी मालकाचीच राहिली असती. त्यामुळे चोरीस गेलेल्या दुचाकीचा गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांत सुमारे ५०० पेक्षा जास्त दुचाकी जप्त आहेत. यातील काही चोरीच्या गुन्ह्यात हस्तगत केलेल्या आहेत.
जिल्हापेठ पाेलीस स्टेशन येथील भंगार वाहने

चोरीच्या गुन्ह्यात सतर्कता हवी
कोणत्याहीप्रकारचा मुद्देमाल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी सतर्क राहणे अपेक्षित आहे. फिर्याद दाखल नसल्यास मिळालेला मुद्देमाल मूळ मालकाला देण्यासाठी कायदेशीर अडचणी येतात; असे झाल्यास कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फिर्याद दाखल करून घेणे आवश्यक आहे. अॅड.राजेशगवई, सरकारीवकील