आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकल ‘चोरनी’ पोलिसांच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवकाॅलनी जवळील एका हाॅटेलजवळून नऊ दिवसांपूर्वी एका वृद्धाची मोटारसायकल चाेरी झाली हाेती. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिसांनी मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता न्यायालयाच्या मागील बाजूस सापळा रचून एका तरुणीला अटक केली अाहे. या तरुणीने मोटारसायकल चाेरून तिची नंबर प्लेट बदलल्याची कबुली दिली.
दादावाडी परिसरातील दशरथ देवचंद पाटील (वय ६०) हे १० अाॅक्टाेबरला त्यांच्या मोटारसायकलने (क्रमांक एमएच-१९-सीडी-६४७९) पिंप्राळा येथे त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी गेले हाेते. मुलीला भेटून परत जात असताना शिव काॅलनीजवळील हाॅटेल अादर्श परिसरात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी गाडी हाॅटेलच्या मागे लावली. त्यानंतर त्यांचा मुलगा सुनील पाटील याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुनील पाटील मोटारसायकल घेण्यासाठी हाॅटेल अादर्शजवळ गेले. मात्र, त्या ठिकाणी मोटारसायकल नसल्याने पाटील यांनी १४ अाॅक्टाेबरला रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गाडी चाेरीबाबत दुचाकी चोरणाऱ्या ज्याेती पाटील हिला घेऊन जाताना पोलिस.

संशय येऊ नये म्हणून पाेलिसांचा लाेगाे
चाेरी केल्यानंतर ज्याेतीने मोटारसायकलवर भुसावळ येथील एका दुसऱ्या मोटारसायकलचा क्रमांक टाकून घेतला हाेता. तसेच शीट कव्हर बदलवले. काेणालाही संशय येऊ नये, म्हणून गाडीवर पुढे अाणि मागे पाेलिसांचा लाेगाे टाकला.

धरणगावच्या पोलिस ठाण्यातही नोंद
अमळनेरयेथील असलेली ज्याेती पाटील अनेक वर्षांपासून जळगावात राहते. पतीच्या निधनानंतर ती तृतीयपंथीयांच्या संगतीत लागली. त्यामुळे ती छाेटे गुन्हे करीत हाेती. धरणगाव येथे तिच्यावर जबरदस्तीने घरात घुसण्याचा गुन्हा दाखल अाहे. मोटारसायकल चाेरीच्या गुन्ह्यातही तिला धरणगावच्या एकाने मदत केल्याची कबुली दिली अाहे.

अाताचाेरी करण्यात महिलाही आघाडीवर
शहरात महाबळ परिसरातील नूतन वर्षा काॅलनीतील घरफाेडी, रिक्षा बसून महिलांच्या पर्समधून एेवज लंपास करणारी टाेळी, फुले मार्केटमध्ये चादरी अाडव्या लावून दुकाने फाेडणाऱ्यांमध्ये महिलांच हाेत्या. त्यानंतर अाता मोटारसायकल चाेरीतही महिला सापडली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...