आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीचा कट लागला; तिघांची टाळकी फाेडली, जखमी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माेटारसायकलचा कट लागल्याने तीन जणांना जमावाने बेदम मारहाण करत तिघांची डाेकी फाेडल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पांजरपोळजवळील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

मारहाणीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून इतर दोघांना किरकोळ मार लागला आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नेरी नाका परिसरातून शनिपेठकडे जात असताना पांजरपोळ चौकात माेटारसायकलचा कट लागल्याने माेटारसायकलवरील तिघा तरुणांना परिसरातील टोळक्याने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, मारहाण करणारे जखमी एकमेकांना ओळखत होते. पूर्वीचा किरकोळ वाद आणि शनिपेठेतील प्रतिष्ठित कुटुंबातील नातेवाईक असल्याने कारण नसताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा संशय प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला आहे.

शाब्दिकवाद चिघळला
कासीमखान वाहीद खान हा तरुण त्याच्या दोघा मित्रांसोबत पांजरपोळजवळ कट मारून गेला; त्यातून प्रारंभी शाब्दिक वाद उद््भवला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत सागर कबुतरवाला, नीलेश, आकाश, छोटू किरानावाला यांचाही सहभाग होता. त्यांनीच बेदम मारल्याचे जखमींनी प्रत्यक्षदर्शी तरुणांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती.

उशिरापर्यंत तक्रार दाखल नव्हती
दरम्यान, या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत रात्री उशिरापर्यंत पाेलिस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. हा वाद पुन्हा वाढेल, अशी शक्यताही काही जणांनी वर्तवली.
बातम्या आणखी आहेत...