आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या प्रवाशांना मिळणार जैविक शौचालयाची सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - स्वच्छता सप्ताहा अंतर्गत शुक्रवारी डीआरएम कार्यालयात ‘स्वच्छ संवाद’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी एडीआरएम अरुण धार्मिक, मंडल सुरक्षा आयुक्त रमेश सरकाटे, रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सी. एन. पिपंरीकर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनीलकुमार मिश्रा, वरिष्ठ यांत्रिक अभियंता दिनेश गजभिये, वरिष्ठ संरक्षा अधिकारी कुलविंदरसिंग आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना डीआरएम गुप्ता म्हणाले की, अडीच वर्षांपासून केंद्र शासनातर्फे स्वच्छता अभियानाची परिणामकारकपणे अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, या अभियानाला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र आता या अभियानाचे महत्त्व वाढले आहे. समाजातील अनेक संस्था या उपक्रमात सहभागी होत आहेत. रेल्वेनेही या अभियानात सहभाग घेतला आहे. स्वच्छता सप्ताहातून भुसावळ विभागातील सर्व प्रमुख स्थानकांवर पथनाट्यांद्वारे प्रबोधन केले जात आहे. भुसावळ विभागातील जळगाव, अकोला, शेगाव, बडनेरा, नाशिक, बऱ्हाणपूर, खंडवा आदी स्थानकांवर स्वच्छता अभियानातून जनजागृती केली जात आहे. शुक्रवारी या सप्ताहात ‘स्वच्छ संवाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून रेल्वेसह संपूर्ण समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही गुप्ता यांनी केले.

सॉलिडवेस्ट मॅनेजमेंट करणार :रेल्वे प्रशासनाकडून आता वेस्ट वॉटर डिस्पोजल, बायो टॉयलेट सॉलिड वेस्टेज मॅनेजमेंट आदींसाठी प्रयत्न आहेत, अशी माहिती वरिष्ठ मंडळ प्रबंधक सुनीलकुमार मिश्रा यांनी दिली. सध्या दिल्ली स्थानकावरील सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट उपक्रम आता देशभरात राबवला जाईल. यामुळे स्वच्छतेसह वीजनिर्मिती करता येणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

डेंग्यू, चिकुनगुन्यावर नियंत्रण
कार्यशाळेत रेल्वेच्या मुख्य चिकित्सालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन शिरसाट यांनी चिकुनगुन्या डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी स्वच्छतेचे आवाहन केले. प्लास्टिकसह अविघटनशील वस्तूंचा मानवी वापर वाढला आहे. यामुळे सध्या स्वच्छतेची गरज निर्माण झाली आहे. एडिस इजिप्ती हा डास साचलेल्या पाण्यामुळे उत्पन्न होतो, यामुळे स्वच्छता ठेवल्यास आरोग्यही उत्तम राहील, असा सल्ला त्यांनी दिला.

उपकरणांची दिली माहिती
औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेसाठी विविध उपकरणे तयार करून देणाऱ्या ‘कोमेक इंडिया’या कंपनीतर्फे कार्यशाळेत रेल्वेकडून वापरल्या जाणाऱ्या विविध यंत्रांची माहिती देण्यात आली. व्हॅक्युम क्लिनरसह विविध यंत्रांमुळे अवघड अडचणीच्या ठिकाणीही कशा प्रकारे स्वच्छता केली जाते, याची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. भुसावळ विभागीय रेल्वेकडूनही यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छता करण्यात येते, याबाबतची चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...