आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख-शांती, समृद्धीसाठी शीख बांधवांची प्रार्थना, गुरुनानक जयंती जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सर्वत्रसुख-शांती समृद्धी लाभो या प्रार्थनेने शिखांचे धर्मगुरू गुरुनानक यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त शहरातील गुरुद्वारात गुरुद्वार गुरुसिंग सभेतर्फे विविध कार्यक्रम झाले. सकाळी 10 वाजता निशानसाहेब यांच्या ध्वज बदलवण्याच्या सेवेनंतर शीख समाजाचे संत गुरुप्रीतसिंग छाबडा यांच्या गुरुसा कीर्तन शपथ कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या वेळी आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पाठाची समाप्तीही झाली. यानिमित्त पाच दिवस शहरातील विविध मार्गांवर प्रभातफेरीही काढण्यात आली.
"वाहे गुरू का खालसा...वाहे गुरू की फते' या जयघोषात गुरुनानकांच्या आदर्शाप्रमाणे कार्य करण्याचा संकल्पही या वेळी समाजबांधवांनी केला. यानंतर हरदास या कार्यक्रमात शीख बांधवांनी सर्वत्र सुखशांतीसाठी प्रार्थना केली. दुपारी "गुरू का लंगर' या महाप्रसादाच्या कार्यक्रमात दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या निमित्त आर.आर.विद्यालयाजवळील गुरुद्वाराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासह रात्री भजन कीर्तनाचाही कार्यक्रम गुरुद्वारात झाला. रात्री एक वाजून 20 मिनिटांनी गुरुनानक जन्मोत्सव साजरा झाला. या वेळी फटाक्यांची आतषबाजीही झाली. त्यानंतर महाआरतीने उत्सवाची सांगता झाली. अध्यक्ष सजमितसिंग छाबडा, जयदीपसिंग छाबडा, तेजंदरसिंग महेंद्रा, गुरुजीतसिंग अरोरा, कमल अरोरा, बन्टी छाबडा, सोनू जुनेजा, जसपाल अरोरा यांनी नियोजन केले. धर्मगुरु गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारात गुरुद्वार गुरुसिंग सभेतर्फे गुरुवारी घेण्यात अालेल्या कार्यक्रमात भजने गाण्यात आली.

गुरुद्वारात महाआरतीवेळी उपस्थित महिला. जळगाव निमखेडी येथील अष्टांग योग बहुउद्देशीय संस्था संचलित नित्य योग वर्गातर्फे गुरुवारी गुरुनानक जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’ अभियान राबवण्यात आले. पहाटे 5.30 वाजता प्रा.अविनाश कुमावत यांनी साधकांना मार्गदर्शन करून साफसफाईला सुरुवात केली. अभियानात सुमारे 60 साधकांनी सहभाग घेतला. या वेळी इंद्रराव पाटील, राजू शर्मा, मंगला शर्मा, नीता सोनवणे, लता सुरडकर, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.