आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेत जन्म-मृत्यूचे दाखले मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेतर्फे जन्म-मृत्यूचे दाखले वितरित करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. या एजन्सीतर्फे गेल्या तीस वर्षांपासूनच्या नोंदी संगणकीकृत करण्यात आल्या असून, तत्काळ दाखले देण्याचे काम केले जात होते; मात्र शुक्रवारपासून नागरिकांना दाखले वितरित करणे बंद आहे. सर्व्हरमध्ये अडचण असल्याची बाब नागरिकांना सांगितली जात आहे.

पालिकेतर्फे दररोज सरासरी 15 ते 20 जन्म-मृत्यूचे दाखले वितरित केले जातात. नागरिकांच्या सोयीसाठी तिसर्‍या मजल्यावर एक विंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. जून महिन्यात शाळा सुरू होणार असल्याने पालकांची गर्दी होत असतानाच तांत्रिक घोळामुळे शुक्रवारपासून सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे.

दुरुस्तीचे काम सुरू
नागरिकांना तातडीने जन्म-मृत्यूचे दाखले देण्यासाठी संगणकीकरण करण्यात आले आहे; परंतु सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू असून, लवकरच सर्व काही सुरळीत होऊन नोंदणी केलेल्या नागरिकांना दाखले वितरित करण्यात येतील, असे एजन्सी प्रतिनिधी अतुल सोमाणी यांनी सांगितले.