आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरासाठी दिलेले पैसे खर्च करण्याचीही एेपत नाही, पालकमंत्री एकनाथ खडसेंचा टाेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव शहराकडे लक्ष देत नसल्याची अाेरड केली जाते. अनेक जण तशी बाेंब मारत असतात. परंतु, हे शहर माझे अाहे. त्यामुळे मी काही सांगताही कामे करीत असताे. म्हणूनच शहरातील महामार्गावर उड्डाणपूल, अमृत याेजनेचा निधी सांगताच मिळवून दिला अाहे. तसेच वर्षभरापूर्वी डीपीसीतून दिलेले एक काेटी रुपयेदेखील मनपा खर्च करू शकले नाही, असा टाेला पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी लगवला.
भाजपचा सक्रिय कार्यकर्ता मेळावा गुरुवारी झाला. त्या वेळी पालकमंत्री खडसे यांनी शहरातील स्थितीबाबत मत मांडले. ते म्हणाले, शहराकडे मी लक्ष देत नसल्याचा अाराेप हाेताे. पण शहराकडे लक्ष देण्यालायक व्यक्ती तेथे नाहीत. त्यांची दिलेले पैसे खर्च करण्याची एेपत नाही. त्यामुळे पैसे काेणाच्या हाती द्यावेत, असा प्रश्न आहे. तरीदेखील शक्य ते करीत अाहे. महामार्गासाठी ५०० काेटी अाणले. अमृत याेजनेतून ४०८ काेटी मंजूर केले. त्यातील १८ काेटी मिळवून दिले. यापूर्वी दिलेले एक काेटी खर्च झाले नाहीत. १९४७ पासून २०१६ पर्यंत जेवढा निधी मिळाला नाही, त्यापेक्षा जास्त निधी एकाच वर्षात अाणल्याचे खडसे या वेळी म्हणाले.

अाणखी उद्याेग येणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून जिल्ह्यात चारपदरी, सहापदरी रस्ते मिळवले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून पाचाेरा-जामनेर ही रेल्वे अजिंठा ते बाेदवडपर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळवली. उमा भारतींकडून मेगा रिचार्जसाठी निधी मिळवणार अाहे. हंसराज अहिर यांच्याकडून भुसावळसाठी प्लास्टिक पार्कला मंजुरी घेतली अाहे. या प्रकल्पासाठी जळगाव एमअायडीसीमध्ये जागा नसल्याचे लेखी उत्तर अाल्यामुळे हा प्रकल्प भुसावळ येथे उभारण्यात येणार आहे. दरम्यान, जळगाव शहरातील दाेन रेल्वेपूल अाणि अाणखी उद्याेग अाणण्याचे नियोजन अाहे, तर रेल्वेपुलासाठी लाेकवर्गणी अावश्यक अाहे. त्यातून मार्ग काढला जात असल्याचेही ते म्हणाले. शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा जळगाव ते भुसावळदरम्यान सहापदरी हाेता, ताे अाता मुक्ताईनगरपर्यंत हाेणार असल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
जिल्हा बँक गाेंधळाची सीअायडी चाैकशी
जिल्हा बँकेत काही बनावट शेतकऱ्यांनी राजकीय हेतूने धिंगाणा घातला हाेता. या प्रकरणाची सीअायडी चाैकशी करण्यात येईल, असे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी १२ जानेवारी राेजी जिल्हा बँकेत खुर्च्या फेकल्या हाेत्या. याप्रकरणी २० शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळ्याचा दराेड्याचा गुन्हा दाखल झाला हाेता. त्या निषेधार्थ १४ राेजी अामदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी थेट जिल्हापेठ पाेलिस ठाण्यावर धडकले हाेते. या प्रकरणासंदर्भात पालकमंत्री खडसे यांनी जिल्हा बँक ही वित्तीय संस्था अाहे. पीक विम्याचे पैसे वितरित करण्याशिवाय बँकेकडे काेणतेही अधिकार नाहीत. अशा स्थितीत काही बनावट शेतकऱ्यांनी तेथे राजकीय हेतूने धिंगाणा घातला. या प्रकरणाची सीअायडी चाैकशी करून नेमके किती शेतकरी हाेते, त्यांचे किती पैसे थकले हाेते, यामागे नेमके काेण अाहे? हे शाेधून काढले जाईल.