आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर! जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देशमुख यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नवरा-बायकाेचीभांडणे झाली की त्याचा निश्चितच मुलांवर परिणाम हाेताे. भाजपमध्येही तसेच हाेत अाहे, नेत्यांमध्येही भांडणे विकाेपाला गेल्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर हाेत अाहे. परवा हद्दच झाली भाजपच्या मंत्र्याने त्यांच्या पक्षातील सहकारी नेत्याच्या मागे लवकरच नवीन झेंगट लागणार असल्याची घाेषणा केली. भाजपमधील या वातावरणामुळे सत्ता असूनही भ्रमनिराश झालेले अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसच्या वाटेवर अाहेत. भाजपसह राष्ट्रवादी अाणि इतर पक्षांतील अनेक परिचित चेहरे काँग्रेसमध्ये येणार असून त्यामुळे ‘जिल्हा हादरेल’ असा दावा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी विनायकराव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
देशमुख म्हणाले, भाजपचा भ्रमाचा भाेपळा फुटला अाहे. सामान्य जनतेप्रमाणे भाजपवालेही सत्ताधाऱ्यांना वैतागले अाहेत. जळगाव जिल्ह्यातील स्थिती लक्षात घेतली तर हे लाेक जनतेचे प्रश्न साेडवतील की अापसातील भांडणे? असा प्रश्न निर्माण झाला अाहे. याला कार्यकर्तेही चांगलेच कंटाळले अाहे. यामुळेच अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येणार अाहेत.


अाठवड्याला अाढावा
काँग्रेसचे जिल्ह्यातील काम एका ठरावीत पद्धतीने चालले अाहे. प्रत्येक अाठवड्याला कामाचा अाढावा, तालुका बैठका, येत्या तीन महिन्यांचे नियाेजन यासंदर्भात अाढावा घेतला जात अाहे. पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त हाेईल, याचा विश्वास असल्याचे देशमुख या वेळी म्हणाले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस तथा माजी अामदार शिरीष चाैधरी, प्रदेश सचिव डी.जी.पाटील, अॅड. अविनाश भालेराव उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...