आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल शिवसेनेपुढे भाजपचेच अाव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध करीत सत्तेवर आलेल्या शिवसेनेत सध्या भाजप विरोध खदखदत आहे. शिवसेना पदािधकाऱ्यांच्या हातात स्मार्टफोन असतात. मात्र, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मात्र भाजपचेच नेते योग्यरीत्या करताना दिसतात. त्याच्याच अनुषंगाने शिवसेनेने शनिवारी काढलेली रॅली पूर्णत: डिजिटलायझेशन पद्धतीची होती. भाजपचा विरोध आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जाईल, असा संदेश यातून देण्यात आला.

शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी तीस वर्षे युती कायम ठेवली; परंतु गेल्या दीड वर्षात दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू झाले आहेत. याचे प्रतिबिंब सध्या शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीत उमटत आहेत. संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यासह स्थानिक स्तरावरील प्रत्येक पदािधकारी भाजपलाच दूषणे देताना दिसतो. भाजपवरच आरोप करतो. हे कमी झाले की काय म्हणून आता भाजप ज्या तंत्रज्ञानाच्या मार्गाने यश मिळवित आहे. त्याच मार्गाने शिवसेना जायला तयार झाली आहे. त्यामुळेच शिवसेना किती डिजिटल झाली आहे. हे दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी शिवसेनेने काढलेल्या रॅलीत दिसून आला. भाजपसारखे तंत्रज्ञान विकसित करत तरुणांना खेचण्यासाठी शिवसेना आता स्मार्ट होण्याकडे लक्ष देत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य...
शिवसेनेने ५० वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात सध्या शिवसेनेकडे तरुण पदािधकारी सर्वाधिक आहेत. काळाच्या ओघात तंत्रज्ञानावर आधािरत राजकारण सुरू झाले आहे. केवळ फेसबुक व्हॉट‌्सअॅप या दोनच माध्यमांनी राजकारण काबीज केलेले असताना आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिवसेना तोंड द्यायला निघाली आहे. भाजपने या सगळ्या गोष्टींचा यापूर्वीच अवलंब केला आहे. याच गोष्टीचा शिवसेनेला राग येतो. त्याचे खापर दुसरे आरोप करून फोडले जाते. यापेक्षा शिवसेनेलाच तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणून थेट तरुणांपर्यंत नेण्याचा प्रयत्न होणार आहे.