आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या सुनेला रावेरमधून उमेदवारी, जावळेंचा पत्ता कट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांना दिलेली उमेदवारी रद्द करत ऐनवेळी पक्षाने एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी ही घोषणा केली. त्याबाबतचा फॅक्स दुपारी जळगाव जिल्हा भाजप कार्यालय व जावळे यांनाही प्राप्त झाला. त्यात विशेष परिस्थितीनुसार जावळेंऐवजी रक्षा खडसेंना उमेदवारी निश्चित झाल्याचे म्हटले आहे. रक्षा खडसे यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांच्याशी होईल.