आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या उड्डाणाला जळगावकरांचे बळ, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचे प्रमुख ठाकूर, बढेंचा सत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भारतीय जनता पक्षाने देशात १० कोटी, तर महाराष्ट्रात कोटी सदस्य बनवून मोठे यश संपादित केले आहे. राज्यभरात सदस्यनोंदणी अभियानाची रणनीती आखून त्यात यश काबीज करण्यात जळगावचे रहिवासी प्रदेश चिटणीस सुनील बढे यांचीही भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचे प्रमुख सुजितसिंह ठाकूर यांच्यासह दोघांचा सत्कार करून कौतुक केले.

राज्यात भाजपच्या सदस्यनोंदणी अभियानाची सुरुवात १९ नोव्हेंबर २०१४ रोजी करण्यात आली होती. त्यात महिन्यांमध्ये भाजपचे कोटी सदस्य करण्याचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. या अभियानाची जबाबदारी ठाकूर बढे यांच्यावर प्रामुख्याने होती. औरंगाबाद येथे पालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभियानाच्या दोन्ही प्रमुखांचा जाहीर सत्कार केला. याप्रसंगी राज्याचे मंत्री बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, दिलीप कांबळे, खासदार ए.टी.पाटील आदी उपस्थित होते. देशात १० कोटी सदस्य झाल्याने भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे.

फोटो - पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुनील बढे सुजितसिंह ठाकूर यांचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस.