आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार सुरेश भाेळे निधीतील कामांची भाजप नगरसेवकाची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलमोहोर कॉलनीत रस्त्यावर साचलेले गटारीचे पाणी. - Divya Marathi
गुलमोहोर कॉलनीत रस्त्यावर साचलेले गटारीचे पाणी.
रामानंदनगर- अामदार सुरेश भाेळे यांच्या निधीतून मंजूर अारसीसी गटार स्लॅब कल्व्हर्टचे काम अपूर्णावस्थेत साेडून दर्जाहिन असल्याची तक्रार भाजप नगरसेवक रवींद्र पाटील यांनी अायुक्तांकडे केली अाहे. कामांची नागरिकांसमक्ष चाैकशी करावी, अशी मागणी करताना कामाचे पेमेंट काढताना अधिकाऱ्यांनी अार्थिक व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केली अाहे. यासंदर्भात तिसऱ्यांदा स्मरणपत्र देऊनही काेणतीही दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली अाहे. 
 
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८मध्ये अामदार भाेळेंच्या निधीतून सुमारे साडेसात लाखांचे काम याेगराज कन्स्ट्रक्शन यांना देण्यात अाली अाहेत. मक्तेदाराने अनेक ठिकाणी कामे अपूर्ण साेडली असून बऱ्याच ठिकाणी खडी अासारी कमी प्रमाणात वापरल्याची तक्रार नगरसेवक पाटील यांनी केली अाहे. यासंदर्भात पालिकेच्या अभियंत्यांना नागरिकांनी वारंवार ताेंडी तक्रार केली अाहे. तसेच नगरसेवक पाटील यांनी देखील सहायक अभियंत्यांकडे तक्रार केली; परंतु काहीही कारवाई हाेऊ शकलेली नाही. कामे दर्जाहिन असताना पेमेंट करण्यात अाले अाहे. 
 
याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता पदाधिकाऱ्यांचे फाेन अाल्याने बिले काढावी लागतात, अशी उत्तरे दिली जातात. रस्ते डांबरीकरणाच्या कामातही मक्तेदाराशी साटेलाेटे करून बिले काढून घेतली अाहेत. अायुक्तांनी याप्रकरणाची चाैकशी करून फाेन करून चुकीच्या पद्धतीने बिले काढण्यास सांगणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत. याेगराज कन्स्ट्रक्शनने केेलेल्या कामांची चाैकशी करावी, त्यात ते दाेषी अाढळल्यास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली अाहे. अायुक्तांना देखील यासंदर्भात तिसऱ्यांदा स्मरणपत्र देण्यात अाल्याचे नगरसेवक पाटील यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...