आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीच्या कामासाठी दिला भाजपच्या नगरसेविकेने ठिय्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - राष्ट्रवादी नगरसेविकेच्या वाॅर्डात जलवाहिनी टाकण्यात अाली. मात्र, प्रभाग मध्ये दाेन वर्षांपासून काम प्रलंबित अाहे. प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत अाहे, असा अाराेप करीत भाजपच्या नगरसेविकेने सभागृहातच ठिय्या दिला. राष्ट्रवादीच्या मायादेवी परदेशी यांनीही काही सांगायच्या प्रयत्नात सभागृहात बैठक मारली. त्यामुळे गुरुवारी झालेल्या स्थायीच्या सभेत काही काळ तणावाचे वातावरण हाेते. मात्र, सभापती साेनल शिंदे यांनी बाजू सावरून घेत जलवाहिनी टाकण्याचे अादेश दिले. त्यानंतर कामकाज सुरू झाले.
शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये जलवाहिनी नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने पाइपलाइन टाकण्याचे काम करावे, अशी मागणी भाजप नगरसेविका प्रतिभा चाैधरी यांनी स्थायी समितीच्या सभेत केली. मात्र, जलकुंभाची जागा निश्चित झाल्यावर काम करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात अाले. त्यावर राष्ट्रवादीच्या नगरसेविका मायादेवी परदेशी यांच्या प्रभागात कसे काम झाले, याची विचारणा त्यांनी केली. त्यावर नगरसेविका मायादेवी परदेशी यांनीही बाजू मांडण्याची धडपड केली. बोलण्यासाठी माइक मागितला. मात्र त्यावर प्रशासनाने उत्तर द्यावे ते दिल्याशिवाय सभागृहातून उठणार नाही, अशी भूमिका घेत प्रतिभा चौधरी यांनी सभापतींच्या समाेरील जागेवर सभागृहात ठिय्या दिला. त्यानंतर मायादेवी परदेशी याही प्रतिभा चाैधरी यांच्याशेजारी जाऊन बसल्या. त्यानंतर परदेशी यांनी प्रभाग २१ मधील जलवाहिनीचे काम दोन वर्षांपूर्वी मनपा फंडातून मंजूर केले अाहे. त्याची पूर्तता केली अाहे, असे सांगितले. तर सभापती सोनल शिंदे यांनी तातडीच्या िठकाणी पाइपलाइन करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यावर चौधरी जागेवरून उठल्या. याचवेळी शहरात आतापर्यंत तीन हजार अवैध नळजोडण्या मनपा पाणीपुरवठा विभागाच्या कारवाईत आढळल्या आहेत. यापेक्षाही त्या अधिक आहेत. अवैध नळजोडणी करताना ती खासगी प्लंबरकडून करून घेण्यात येते. त्यातून महापालिकेचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न बुडत आहे.

वॉर्डांमध्ये फवारणी होतच नाही
नगरसेविका िचत्रा दुसाने यांनी प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. त्यानंतरही प्रभागात पूर्णपणे फवारणी करण्यात येत नाही. तर डेंग्यूचे रुग्ण परिसरात वाढत असल्याचेही या वेळी सांगितले. सभापती सोनल शिंदे यांनी प्रशासनाला शहरात डेंग्यू थांबला पाहिजे. तसेच यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी डेंग्यूने मृत झालेल्या महिलेल्या श्रद्धांजली वाहण्यात अाली.

प्रशासकीय इमारत खर्चाचे विषय मंजूर
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत विद्युतीकरण, फर्निचर संरक्षण भिंतीसाठी साधारणपणे साडेचार कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. हा खर्च मनपा फंडातून करावयाचा असून, त्यासाठी मार्चच्या अर्थसंकल्पात तरतूद करावयाची आहे. आता सुधारित अर्थसंकल्पातील शिल्लक निधीतून या कामाला सुरुवात होणार आहे. या वेळी प्रतिभा चौधरी यांनी या कामाच्या अंदाजपत्रकाची मागणी केली आहे. मनपा फंडात एवढा निधी नसताना काम कसे करणार असा प्रश्नही उपस्थित करून प्रशासनाला निधीची जाणीव करून दिली.
िनधीअभावी कामे थांबली
नगरसेवकांनातत्कालीन आयुक्त नामदेव भोसले यांच्या कार्यकाळात पंधरा लाखांचा निधी विकास कामांसाठी मंजूर झाला होता. मात्र ती कामेही निधीअभावी अपूर्ण आहेत. ठेकेदारांची बिले दिल्याने कामे होत नाही. प्रशासनाने िबले देण्याचे आश्वासन दिले होते,असे नगरसेवक संदीप पाटोळे यांनी सांगितले. त्यावर उपायुक्त रवींद्र जाधव यांनी ठेकेदारांची बैठक घेऊ अायुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. कामे होत नसल्यामुळे एकीकडे नागरिकांना सुविधा मिळत नाही. तर दुसरीकडे तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे नगरसेवक प्रशासनापुढेही पेच पडला आहे.
बातम्या आणखी आहेत...