आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या मागणीप्रमाणे उद्या विशेष महासभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनपा प्रशासनाने गाळेप्रकरणी अापला लेखी अभिप्राय दिल्यानंतरही केवळ भाजपच्या हट्टापायी धाेरण ठरवण्यासाठी बुधवारी महासभा हाेणार अाहे. खाविअा, मनसे राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केल्यामुळे अाता केवळ अायुक्तांच्या उपस्थितीत बैठकीचे साेपस्कार पार पाडले जाणार अाहेत. भाजप काय भूमिका घेते, हे मंगळवारी निश्चित हाेण्याची शक्यता अाहे.
महापालिका जळगाव शहराच्या विकासावर परिणाम घडवून अाणणाऱ्या १४ मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत प्रशासनाने कलम ७९ प्रमाणे कारवाई करणे याेग्य राहील असे स्पष्ट मत व्यक्त केले अाहे. केवळ प्रशासनाने स्पष्ट अभिप्राय द्यावा म्हणून गेल्या दीड महिन्यापासून गाळ्यांचा प्रश्न लटकलेला अाहे. १९ राेजी झालेल्या महासभेत भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी निर्णय घेण्याची तयारी दर्शवली हाेती. मात्र, भाजपच्यावतीने हा अभिप्राय अायुक्तांनी स्वत: द्यावा सभागृहात स्पष्ट मत द्यावे, अशी मागणी करत विषय तहकूब ठेवला हाेता. त्यानंतर अायुक्तांच्या उपस्थितीचा कल घेत येत्या बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष महासभा हाेणार अाहे.

भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण
गाळ्यांचाविषय सर्वानुमते झाल्यास काेणतीही अडचण येत नाही. त्यामुळे पालिकेच्या हिताच्यादृष्टीने एकमताने निर्णय व्हावा, अशी अपेक्षा सभागृहाची अाहे. साेमवारी नितीन गडकरी जिल्हा दाैऱ्यावर असल्याने मंगळवारी गाळेप्रश्नी नेत्यांसाेबत चर्चा करून भाजपची भूमिका ठरणार अाहे.

वारसा हक्कातील ३२ जणांना नियुक्ती
सफाई कामगारांच्या वारसाच्या नियुक्तीसाठी नेमलेल्या लाड-पागे समितीच्या निर्णयानुसार सोमवारी ३२ वारसांना नियुक्ती देण्यात आली. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्याहस्ते हे नियुक्तिपत्र देण्यात आले. मात्र, या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका कंचन सनकत यांची उपस्थिती नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सनकत यांनी महासभेत हा विषय लावून धरला होता. तसेच या मागणीसाठी अखिल भारतीय मजदूर संघाने अनेक आंदोलने केली होती.