आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रिपदावरून तावडेंची गुगली पंकजाचे नाव पुढे करून खडसेंना चिमटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव /जळगाव - विधानसभेच्या निकालानंतर महायुतीचेच सरकार येणार, असे गृहीत धरून मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना भाजपातील अंतर्गत राजकारणानेही जोर पकडला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मोर्चेबंाधणी सुरू केली असल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते विनोद तावडे यांनी संघर्ष यात्रेच्या सभेत मुख्यमंत्रिपदी अचानक पंकजा मुंडे यांचे नाव पुढे करून गुगली टाकली. तावडेंनी खान्देशच्या भूमीवर पंकजाचे नाव पुढे करून खडसेंना चिमटा काढला. त्याचबरोबर पंकजा भोवती असलेल्या सहानुभूतीचा फायदाही मिळवण्याच्या दृष्टीनेही ही गुगली टाकल्याचे बोलले जाते.

चाळीसगाव येथील संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत बोलताना तावडे म्हणाले, संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता पंकजाताई राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. तावडेंच्या सूचक व्यक्तव्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून भाजपत सुरू असलेल्या रस्सीखेचने आणखीनच जोर पकडल्याचे दिसून आले. महायुतीचे सरकार सत्तेवर येणार, असे गृहीत धरून शिवसेना-भाजपसह महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी आतापासूनच नेत्यांमध्ये चढा-ओढ,मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. खडसेंनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. जळगावात सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन यांनी खडसेच्या वाढदिवसाला हजेरी लावून सर्वांनाच चकीत केले होते. त्यामुळे जळगावात नवी राजकीय समीकरणे अाकारास येण्याची िचन्हे अाहे.
खडसेंसोबतच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदाची नवीच टूम काढून त्यांनी पंकजाचे नाव पुढे केले आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मंुडे यांच्या निधनानंतर सहानुभूतीचा फायदा मिळवण्याचाही हेतू त्यामागे असू शकताे. पण पंकजांचे नाव पुढे करून त्यांनी खान्देशच्या भूमीवरच खडसेंप्रमाणेच आमदार गिरीश महाजन यांनाही िचमटा काढला आहे. प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्याकडे स्मित हास्य करून मुख्यमंत्री पदासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासाठी जागा सोडा, असा टोलाही लगावला. पण आपण मात्र गृहमंत्रीच होणार, हेदेखील त्यांनी सांगून टाकले. त्यांची ही गुगली अनेकांना क्लीन बोल्ड करणारी ठरली, अशी खमंग चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली असून ते स्वत: मुख्यमंत्रिपदाच्या रेसमधून बाहेर पडले की काय? असाही प्रश्न उपस्थित होतोय.