आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात खडसे समर्थकांनी भाजप बैठक उधळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - निमंत्रण पत्रिकेत एकनाथ खडसेंचे नाव चाैथ्या क्रमांकावर टाकल्याने संतपालेल्या समर्थकांनी भाजपची जिल्हा बैठक उधळून लावली. जलसंपदामंत्री गिरीश महाजनांपुढे जाऊन कार्यकर्त्यांनी पत्रिकेत सन्मानपूर्वक नाव का घेतले नाही, असा जाब विचारत गाेंधळ घातला. खडसेंनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांनी
पाऊण तास सभागृह डाेक्यावर घेतले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच बैठक रद्द केल्याची घाेषणा करण्यात अाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जामनेरला रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियाेजनासाठी ही बैठक बोलावली हाेती. या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह आमदार- खासदार उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष उदय वाघ प्रास्ताविकासाठी उभे राहताच निमंत्रण पत्रिकेबाबत खुलासा केल्याशिवाय बैठक चालू देणार नसल्याच्या घाेषणा देत खडसेंचा जयघाेष करीत कार्यकर्ते व्यासपीठाकडे धावले. त्यांनी महाजन यांनाच जाब विचारला.

कार्यालयाला टाळे
बैठक रद्द झाल्यानंतर काही खडसे समर्थकांनी भाजप कार्यालयाकडे धाव घेतली. पक्षाने खडसेंवर अन्याय केला अाहे. त्यांना मंत्रिपदावर घेत नाहीत, ताेवर पक्षाचे काम न करण्याचा संकल्प करीत पक्ष कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला.
बातम्या आणखी आहेत...