आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप गटनेता निवडीमागे सामाजिक गणित, अागामी निवडणुका लक्षात ठेवून चाैफेर विचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर बहुजन नेतृत्वावर अन्याय झाल्याची टीका हाेऊ लागली अाहे. त्यामुळे विशिष्ट समाज वर्गाला संधी देता इतर समाजातील लाेकप्रतिनिधींनाही सामावून घेण्याच्या दृष्टीने भाजपत विचार सुरू झाला अाहे. महापालिकेच्या गटनेता निवडीनंतरही हा निकष लावला जाणार असून विराेधीपक्ष नेता गटनेता एकाच समाजाचे देता इतरांना ज्येष्ठतेनुसार संधी दिली जाण्याची शक्यता अाहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी पालिकेतील भाजप नगरसेवकांची नुकतीच बैठक झाली. यात गटनेता बदलाची मागणी करण्यात येऊन महानगराध्यक्ष तथा अामदार सुरेश भाेळे यांना पत्र देण्यात अाले. भाेळे दाेन दिवस बाहेरगावी असल्याने नवीन नावाची घाेषणा हाेऊ शकलेली नाही. ही घाेषणा अाणखी काही दिवस लांबण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. गटनेता बदलाच्या निमित्ताने जातीय समीकरण पक्षातील ज्येष्ठ, ज्युनियरची चर्चा रंगू लागली अाहे. गटनेता हा कसा असावा, त्यादृष्टीने अाता निकष लावायला सुरुवात झाली अाहे. ज्यांना पद हवे अाहे ते ज्येष्ठतेनुसार नव्हे तर सभागृहात बाेलण्याचा निकष पुढे करीत अाहेत. तर सभागृहातील अनुभव हा महत्त्वाचा असल्याचे काहींचे मत अाहे. यासाेबतच विराेधीपक्ष नेता लेवा समाजाचा असल्यामुळे अाता गटनेतापदी इतर समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा विषय पुढे येत अाहे. अागामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता सगळ्याच बाजूने विचार करून पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न हाेण्याची शक्यता अाहे.

माळी, चव्हाण, साेनवणेंचे नाव?
गटनेता पदासाठी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक सुनील माळी यांच्या नावाला जवळजवळ सर्वांचा हाेकार अाहे. माळींव्यतिरिक्त माजी सभापती ज्याेती चव्हाण स्थायी समिती सदस्य पृथ्वीराज साेनवणे यांच्याकडेही लक्ष वेधले जात अाहे. रवींद्र पाटील हेदेखील इच्छुक असल्याचे बाेलले जात अाहे. परंतु, पाटील साेनवणे हे प्रथमच निवडून अाले असून चव्हाण यांना पक्षाने सभापतीपदाची जबाबदारी दिली हाेती. साेनवणे हे स्थायी समितीत असल्याने त्यांना पक्षाची बाजू मांडण्याची संधी अाहे. त्यामुळे माळी यांच्याकडे सध्या माेठी जबाबदारी नसल्याने तसेच सर्व नगरसेवकांत ज्येष्ठ असल्याने त्यांच्या नावावर जाेर दिला जात अाहे. माळींना संधी दिल्यास बहुजनांना संधी दिल्याचा संदेश पक्षातून दिला जाणार असून माळी समाजाचा पाठिंबा मिळवणे साेपे जाणार असल्याचा अंदाज काढला जात अाहे. त्यामुळे भाेळे हे माळींना संधी देतात की, मर्जीतील नगरसेवकाचे नाव पुढे करतात, याकडे लक्ष लागले अाहे.
बातम्या आणखी आहेत...