आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपीनाथ मुंडेंच्या वक्तव्यांचा ‘अर्थ’ खडसेनी काय घ्यावा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार, खडसे अर्थमंत्री होणार आणि राज्याचा खजिना जळगावकरांच्या हाती लागणार. त्यामुळे खडसे जळगावकरांचे कर्ज एका फटक्यात माफ करतील असे भाकीत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले. तथापि, खरंच राज्यात भाजपचे सरकार आले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदांची आस लावून बसलेल्या एकनाथ खडसे यांनी मुंडे यांच्या वक्तव्याचा ‘अर्थ’ काय घ्यावा असा प्रश्न खडसेंना पडला नसेल तर नवलच.

मुख्यमंत्र्यानंतरचे सर्वात मोठे पद खडसेंकडे आहे. मुंडेदेखील राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे खडसेंची पुढची पायरी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्रिपदाची आहे; परंतु दस्तुरखुद्द खासदार मुंडेंनीच भाजपच्या सरकारमध्ये खडसे अर्थमंत्री होतील अशी घोषणा सहज केली. त्यामुळे मुंडे पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होतील की काय? असा अर्थही त्यातून निघतो.