आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदारांना चिंता दत्तक गावाची, ए. टी. पाटलांनी घेतला कामांचा आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भाजप खासदार रक्षा खडसे यांनी गुरुवारी दत्तक घेतलेल्या गावांसह आपल्या मतदारसंघापुरती आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला तीन fnवस उलटत नाही ताेपर्यंत जळगाव मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील यांनीही जिल्हा परिषद गाठत आपल्या मतदारसंघातील कामांची आढावा बैठक घेतली. यात त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील कामांसंदर्भात विशेष रस दाखवला.
महिनाभराच्या दीर्घ सुटीवरून परतलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत खासदार ए. टी. पाटील यांनी सोमवारी बैठक घेतली. केंद्र सरकारच्या विविध योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यावर चर्चा करण्यात अाली. जळगाव लाेकसभा मतदारसंघात कोणती कामे झाली आहेत? काेणती प्रलंबित आहेत? केंद्राकडून काही मदत अपेक्षित आहे का? यासंदर्भातील माहिती त्यांनी जाणून घेतली. या बैठकीस सर्व विभागप्रमुखांना जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल सादर केला. या वेळी पाटील यांनी दत्तक घेतलेल्या चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील विकासकामांची त्यांनी विशेषत: जातीने चौकशी केली.
आधी रक्षा खडसे त्यानंतर तीन दिवसांनी ए. टी. पाटील यांनी बैठक घेतली. दोन्ही खासदारांनी समन्वयाने एकच बैठक घेऊन काही प्रश्न सामूहिकपणे हाताळल्यास जिल्ह्याला याचा फायदा होऊ शकतो. मात्र, दोन्ही खासदारांनी मतदारसंघापुरती विचार केल्याने दोघांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. दोन्ही खासदारांनी एकत्र बैठक घेऊन संपूर्ण जिल्ह्याच्या विकासावर चर्चा घडवून आणणे अभिप्रेत आहे. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा प्रयाग कोळी, शिक्षण आरोग्य सभापती सुरेश धनके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कुटे, राजन पाटील, नंदकुमार वाणी, यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
पोषण आहाराच्या तक्रारी प्राप्त
शालेय पोषण आहारासंदर्भात माझ्यापर्यंतही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची फेरचौकशी करण्यासह वेळ पडल्यास गोदाम तपासणीचीही तयारी आहे. यासह जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, सिंचन इतर रखडलेल्या योजनांचा केंद्रात पाठपुरावा करणार आहे. ए.टी. पाटील, खासदार