आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP News In Marathi, Jalgaon District Politics, Lok Sabha Election, Divya Marathi

महिला उमेदवार या मुद्यावरच भाजप देतोय प्रचारात जोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच लोकसभेसाठी महिलेला उमेदवारी दिली आहे. हा महिलांचा सन्मान असल्याचा मुद्दा मांडत भाजपातर्फे महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे विरोधकांकडेही महिला प्रतिनिधी असूनही त्यांना उमेदवारी दिली नसल्याचे भाजपा कार्यकर्ते बोलत आहेत. दरम्यान, निवडणुकीचे वातावरण अद्याप फारसे तापले नसले तरी कार्यकर्ते मुद्याच्या आधारे बाजू मांडत आहेत.
रावेर लोकसभा निवडणुकीत उमेदवार बदलानंतर भाजपाने रक्षा खडसे यांच्या माध्यमातून महिलेला तिकीट देऊन पहिल्यांदाच जिल्ह्यातून महिलेला संधी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून महिला जिल्हाध्यक्षा प्रा.अस्मिता पाटील यांच्या नावावर चर्चा सुरू होती, परंतु पाटील यांचे नाव हळूहळू मागे पडत गेले आणि त्याठिकाणी किशोर पाटलांनंतर डॉ. सतीश पाटील यांचे नाव निश्चित झाले होते. जामनेरातही राष्ट्रवादीच्या ग्रंथालय सेलच्या प्रदेशाध्यक्षा कल्पना पाटील रेसमध्ये होत्या, परंतु मनीष जैन यांना संधी देण्यात आली. परंतु भाजपाने तिकीट बदलानंतर एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना महिला या नात्याने संधी दिल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात भाजपाच्या वाट्यातील एकूण उमेदवारांच्या संख्येत दोन महिलांना संधी दिली गेली आहे. यात रावेर लोकसभेचा समावेश असून खडसेंचा विजय झाल्यास त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार ठरणार असल्याचा भावनिक विचार मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे. या माध्यमातून महिलांना आकर्षित क रताना जातीय समीकरणांचा विचार करता गुर्जर व लेवा समाजातील पहिली महिला लोकसभेची निवडणूक लढत असल्याचा मुद्दा मांडण्यात भाजपा कार्यकर्ते कुठलीही कसर सोडत नसल्याचे दिसत आहे.