आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूखंडांबाबत भाजप जनजागृती करणार; लवकरच आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील मोक्याच्या जागा हडप करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी महापालिकेतील प्रमुख विरोधक भाजप आगामी काळात आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. येत्या महानगरच्या बैठकीत याबाबत रणनीती ठरवण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी होणार्‍या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या हाती प्रचाराचे मुद्दे लागले असून, त्याचाच भाग म्हणून नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शहरातील आरक्षित जागांवरील आरक्षण राजकीय ताकद वापरून उठवण्याचे प्रकार सर्रास सुरू असून, त्यात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. खान्देश बिल्डर्सपाठोपाठ पालकमंत्र्यांच्या जळगाव कन्स्ट्रक्शनने आता लुबाडणे सुरू केल्याचा थेट आरोपही भाजपने केला आहे. तसेच महापालिकेत सत्ताधारी ‘खाविआ’ व ‘राष्ट्रवादी’ यांचे साटेलोटे असल्याचा आरोप करत ते जळगावकरांना लुटत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेतील राजकीय ताकद वाढवण्याच्या दृष्टीने भाजप आक्रमक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शहरात मुलांना खेळायला जागा उरल्या नसून, महत्त्वाचे प्रकल्प राबवायचे म्हटले तर मोकळ्या जागा शोधूनही सापडणार नसल्याची स्थिती आहे. तसेच उद्याने नसल्याने नागरिकांना निवांत बसायलाही ठिकाण नसताना, मनपा आहे त्या जागाही सोडून देत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजप त्याचाच फायदा घेण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने पक्षर्शेष्ठींच्या बैठकीत चर्चा करून आंदोलनाची रणनीती ठरवण्यात येणार आहे. सन 2014मध्ये होणार्‍या मनपा निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या भेटीगाठी घेणे व सत्ताधार्‍यांविरोधात मत तयार करण्याचा प्रय} भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे.
सह्यांची मोहीम राबवणार
>महापालिकेत मनमानी कारभार चालला आहे. भूखंडांचा विषय तर गंभीर असून, त्यात सत्ताधार्‍यांसोबत पालकमंत्र्यांचाही फायदा होत आहे. त्यामुळे जनतेची लूट करणार्‍यांचे चेहरे नागरिकांसमोर आणण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येईल. दीपक साखरे, सरचिटणीस, भाजप
>मनपातील गैरप्रकारांबाबत जनजागृती करण्यासाठी पक्षर्शेष्ठींच्या बैठकीत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. तसेच जनता रस्त्यावर उतरू शकत नसल्याने भाजप जनतेचे प्रतिनिधित्व भविष्यातही करेल. अरुण बोरोले, महानगराध्यक्ष, भाजप