आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप की शिवसेना फायद्याची; खाविआ नगरसेवकांमध्ये खल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिका निवडणुकीला केवळ दाेन वर्षे शिल्लक अाहेत. या कालावधीत शहरात विकासकामांचा धडाका लावून नागरिकांची मने जिंकण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न अाहे. यासाठी जिल्ह्यातील नेतृत्व केंद्रस्थानी ठेवले जात अाहे. पालिकेतील सत्ताधारी खाविअा नगरसेवकांच्या मनातही अापल्याला काेण उपयाेगी पडेल, यावर सध्या खल सुरू अाहे. खाविअाचे विलीनीकरण करायचे झाल्यास काेणता राजकीय पक्ष याेग्य ठरेल, यावर अंतर्गत चर्चां रंगू लागल्या अाहेत. निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवकांनी शिवसेनेला पसंती दिल्याचे सांगितले जात अाहे.

महापालिका निवडणुकीला केवळ दाेन वर्षे शिल्लक अाहेत. या कालावधीत शहरात विकासकामांचा धडाका लावून नागरिकांची मने जिंकण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न अाहे. यासाठी जिल्ह्यातील नेतृत्व केंद्रस्थानी ठेवले जात अाहे. पालिकेतील सत्ताधारी खाविअा नगरसेवकांच्या मनातही अापल्याला काेण उपयाेगी पडेल, यावर सध्या खल सुरू अाहे. खाविअाचे विलीनीकरण करायचे झाल्यास काेणता राजकीय पक्ष याेग्य ठरेल, यावर अंतर्गत चर्चां रंगू लागल्या अाहेत. निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवकांनी शिवसेनेला पसंती दिल्याचे सांगितले जात अाहे.

गेली तीन वर्षे केवळ राजकीय संघर्षात गेलेल्या महापालिकेतील नगरसेवकांना अागामी काळात राजकारणात टिकायचे असेल तर नागरिकांपर्यंत सकारात्मक कामे घेऊन जाणे गरजेचे असल्याचे पक्के मत झाले अाहे. शहरात गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासामुळे नागरिकांमध्ये संतापाचा सूर अाहे. महापालिकेच्या अार्थिक परिस्थितीचे वारंवार उदाहरण दिले जात असले तरी ही परिस्थिती बदलण्याची गरज व्यक्त हाेत अाहे. अाता कामे झाली नाही तर पुन्हा नागरिकांसमाेर कसे जायचे, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांसमाेर अाहे. ही समस्या सध्या पालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास अाघाडीच्या नगरसेवकांसमाेर प्रकर्षाने जाणवत अाहे. त्यामुळे अागामी दाेन वर्षात एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा डाेक्यावर घेऊन थेट भूमिका घेण्याचा मतप्रवाह वाहत अाहे. परंतु याबाबत कुणीही थेट उघड बाेलत नाही.

गुलाबरावांच्या निमित्ताने वाढला कल
सुरेशजैन एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रृत अाहेत. त्यात नवनिर्वाचित सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांचा गत काळात खडसेंसाेबत झालेला संघर्ष खाविअाच्या अनेक नगरसेवकांना भावला अाहे. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत खाविअाच्या नगरसेवकांना गुलाबरावांची साथ लाभली हाेती. अाता गुलाबराव पाटील मंत्री झाल्याने हक्काचा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात अाहे. त्यामुळे जैनांसाेबत गुलाबरावांच्या नेतृत्वात राज्यपातळीवरून जळगावकरांचे प्रश्न मार्गी लागावे, अशी अपेक्षा नगरसेवक व्यक्त करीत अाहेत.

अस्तित्व कुठे राहील, यावर नगरसेवकांमध्ये चर्चा
गेल्या काही महिन्यांपासून खाविअा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी प्रयत्नशिल अाहेत. मेहरूण तलावाच्या निमित्ताने या प्रयत्नांना यशही मिळाले अाहे. महाजन अाणि जैन यांचे संबंध सर्वश्रृत अाहेत. त्यामुळे खाविअाची मंत्री महाजनांसाेबतची जवळीक अधिक अाहे. महाजन हे खाविअाच्या नेत्यांना समजून घेतात. त्यांना सहकार्य करण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे खाविअातील काही नगरसेवकांना अागामी काळात भाजपत सामिल व्हावे असे वाटते. परंतु सुरेश जैन यांनी शेवटची निवडणूक शिवसेनेकडून लढली अाहे. त्यात यापूर्वी नेत्यांनीच शिवसेना म्हणजेच खाविअा खाविअा म्हणजेच शिवसेना असल्याचे वक्तव्य केले अाहे. त्यात खाविअात बहुसंख्य नगरसेवक हे शिवसेनेच्या विचारांचे अाहेत. त्यात अाणखी अापली भर पडली तर भविष्याची चिंताही सतावत अाहे. त्यामुळे निम्मेपेक्षा जास्त नगरसेवक हे शिवसेनेचा भगवा डाेक्यावर घेण्याचे मत व्यक्त करत अाहेत. एकंदर अापले अस्तित्व कुठे राहील, यावर नगरसेवकांमध्ये चर्चा रंगत असून याला अद्याप नेत्यांच्या पातळीवर कुठेही प्राधान्य दिले गेलेले नाही.

गुलाबरावांच्या निमित्ताने वाढला कल
सुरेशजैन एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रृत अाहेत. त्यात नवनिर्वाचित सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांचा गत काळात खडसेंसाेबत झालेला संघर्ष खाविअाच्या अनेक नगरसेवकांना भावला अाहे. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत खाविअाच्या नगरसेवकांना गुलाबरावांची साथ लाभली हाेती. अाता गुलाबराव पाटील मंत्री झाल्याने हक्काचा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात अाहे. त्यामुळे जैनांसाेबत गुलाबरावांच्या नेतृत्वात राज्यपातळीवरून जळगावकरांचे प्रश्न मार्गी लागावे, अशी अपेक्षा नगरसेवक व्यक्त करीत अाहेत.

जैन हेच अामचा पक्ष
खाविअाचे विलीनीकरण काेणत्या पक्षात करायचे यावर अद्याप नेतृत्वात चर्चा नाही. अामचे नेते सुरेश जैन यांनी शेवटची निवडणूक शिवसेनतर्फे लढवली. त्यामुळे अामची सेनेसाेबत नाळ जुळली अाहे. तर विकासासाठी अाम्ही भाजपलाही साकडे घातले. विकासासाठी भाजपच्या नेत्यांकडूनही अद्याप अशी अट अथवा प्रस्ताव नाही. मंत्री गिरीश महाजन खुल्या मनाने मदत करतात. विलीनीकरणाबाबत खाविअा नगरसेवकांचे ते वैयक्तिक मत असू शकते. परंतु त्याबाबत धाेरण ठरलेले नाही. सुरेश जैन हेच अामचा पक्ष असून तेे जिथे तिथे अाम्ही हे स्पष्ट. नितीन लढ्ढा, महापाैर
बातम्या आणखी आहेत...