आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटनात्मक वर्चस्वासाठी दाेन्ही गट सक्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पक्षात अाणि जिल्ह्यात भाजपमधील गटबाजी चर्चेत असताना अाता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरदेखील अापल्या गटाचे वर्चस्व असावे यासाठी पालकमंत्री एकनाथ खडसे जलसंपदामंत्री गिरीश महाजन या दाेन्ही नेत्यांचे समर्थक कामाला लागले अाहेत. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अाणि महानगराध्यक्षपदावर मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी दाेन्ही बाजूने फिल्डिंग लावली जात असल्याने भाजपमधील अंतर्गत राजकारण सध्या सर्वाधिक चर्चेत अाहे.
सत्ता असूनही भाजपमधील संघटनात्मक स्थिती कधी नव्हे, एवढी विस्कटली अाहे. अंतर्गत गटबाजी, हेवेदावे, राजकीय महत्त्वाकांक्षा, व्यावसायिक वापर अादीमुळे संघटनात्मक पातळीवर परस्परांविषयी शंका अाणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याने जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्षपदासाठी सर्वसमावेशक चेहरा निवडणे कार्यकर्त्यांसाठी अवघड झाले अाहे. दाेन्ही गटांकडून संघटनेवर पकड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी, अशा कामात उपयाेगी ठरतील असे चेहरे सध्यातरी दाेन्ही गटांकडून पुढे करण्यात अालेले नाहीत. तसेच जी नावे पुढे करण्यात अाली अाहेत, त्यांच्यातील त्रुटी नकारात्मक बाबी लक्षात अाणून देण्याचे काम काही मंडळी करत अाहेत. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत २५ जानेवारीपूर्वी हाेणाऱ्या जिल्हा बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा हाेण्याची शक्यता अाहे. पक्षातील हालचालींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून अाहे.

याेग्य व्यक्तीची प्रतीक्षा
भाजप जिल्हाध्यक्ष अाणि महानगराध्यक्षपदी संघटनात्मकदृष्ट्या याेग्य व्यक्तीची निवड हाेणे प्रदेश भाजपच्या दृष्टीने अावश्यक अाहे. त्यामुळे जिल्ह्यातील दाेन्ही नेत्यांनी समन्वयातून जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्षांची निवड करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. मात्र, पदे देताना निष्ठावंतांचा निकष लागणार की दाेन्ही गटांमध्ये समन्वय ठेवण्याचे कसब असलेल्या व्यक्तीची निवड हाेणार? याबाबत अनिश्चितता असून, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकतादेखील वाढली अाहे.

अध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत
भाजपजिल्हाध्यक्ष पदासाठी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या गटातून पी. सी. पाटील, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गटातून उपाध्यक्ष गाेविंद अग्रवाल यांची नावे चर्चेत अाहेत. एेनवेळी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अशाेक कांडेलकर यांचेदेखील नाव पुढे येण्याची शक्यता अाहे. भाजपच्या महानगराध्यक्षासाठी विद्यमान अध्यक्ष अामदार सुरेश भाेळे, सुनील खडके, माजी महानगराध्यक्ष अशाेक लाडवंजारी यांचीदेखील नावे चर्चेत अाहेत. पदाधिकाऱ्यांकडून फिल्डिंग लावण्यात येत अाहे.