आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP President Devendra Phadanavis,latest News In Divya Marathi

फडणवीस ताटकळले, एअर ट्राफीकमुळे हेलिकॉप्टरचे उशिरा उड्डाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रचारासाठी भडगाव आणि चाळीसगाव येथे आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस गुरुवारी जळगावच्या विमानतळावर तासभर ताटकळत बसले. एअर ट्राफीकमुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला उशिरा उड्डाणची परवानगी मिळाल्याचे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचे स्वागत, सत्कारही केल्याचे समोर आले आहे. तासभर ताटकळत राहिल्यानंतर ते हेलिकॉप्टरने जळगावहून पाचाेऱ्याकडे रवाना झाले.
फडणवीसांचा दौरा अचानक बदलला. तांत्रिक कारणामुळे त्यांना पाचोरा येथे उतरावे लागल्याने भडगावच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. भडगाव येथे फडणवीस यांना उतरण्यासाठी हेलिपॅड तयार केले होते. मात्र, तांत्रिक कारणाने हेलिकॉप्टर पाचोरा येथे उतरवण्यात आले. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना धावपळ करत पाचोरा गाठावे लागले. तोपर्यंत फडणवीसांचे हेलिकॉप्टर पाचोऱ्यात उतरले होते. भडगावचे पदाधिकारी पोहोचल्यानंतर फडणवीसांचा स्वागत सोहळा पार पडला. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही विमान जळगावात हवेतच ताटकळले होते. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खडसेंचे विमान तब्बल एक तास हवेत घिरट्या घालत होते.

घोटाळ्यामुळे राज्याचे वाटोळे; फडणवीसांचा आरोप
काँग्रेस-राष्ट्रवादीचासफाया झाल्याशिवाय राज्यात स्वच्छता अभियान यशस्वी होणार नाही. आघाडी सरकारने एकापेक्षा एक घोटाळे करून राज्याचे वाटोळे केले आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भडगाव चाळीसगावच्या सभेत केला.
चाळीसगावच्या सभेला दीपक सूर्यवंशी, माजी आमदार साहेबराव घोडे, वाडीलाल राठोड, के. बी. साळुंखे, आनंद खरात आदी उपस्थित होते. या वेळी बाजार समितीचे राष्ट्रवादीचे संचालक सरदारसिंग राजपूत यांच्यासह शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. भडगावच्या सभेच्या व्यासपीठावर उमेदवार डॉ. उत्तमराव महाजन, खासदार पाटील, अमोल पाटील, मधुकर काटे, सुभाष पाटील उपस्थित होते.बेलगंगा साखर कारखान्याचा मुद्दा सर्वच पक्षांच्या सभेत गाजतोय. भाजपच्या सभेतही यावर गरमा-गरम चर्चा झाली. कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेचे स्थानिक संचालक प्रदीप देशमुख यांची अनास्था कारणीभूत आहे. हातात सत्ता असूनही २५ वर्षे पालिकेने शहरवासीयांना तहानलेलेच ठेवले. सत्ताधाऱ्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले असून सर्व समाज घटकांवर मतदानासाठी दबाव आणण्याचे काम सुरू असल्याचा आरोप उन्मेष पाटील यांनी केला.