आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-सेनेचे आरोप प्रत्यारोप, आता कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर- भाजपनेते तथा पालकमंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार तथा उपनेते गुलाबराव पाटील या मित्रपक्षाच्या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे पुतळे जाळण्यापर्यंत मजल मारल्याने खडसेंच्या होम पीचकडे जिल्ह्याचे लक्ष होते. बुधवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपनेते पाटील यांच्या निषेधाचे सूर काढताच, सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी थेट पालकमंत्री खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

बुधवारी भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, तालुकाध्यक्ष निवृत्ती पाटील, राजू माळी, योगेश कोलते, संजय माळी, रमेश पाटील, सरपंच ललित महाजन, मनोज तळेले आदींनी शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. येथे त्यांनी दिलेल्या निवेदनात उपनेते पाटील पालकमंत्री खडसेंवर बेछूट आरोप करून गलिच्छ राजकारण करत आहेत. मंत्रिपद मिळवायचे असेल, तर त्यांनी स्वपक्षाकडे आग्रह धरावा. मात्र, मंत्रिपदासाठी नाव मागे पडत असल्यानेच ते खडसेंवर आरोप करत आहेत. किमान यामुळे तरी पक्ष दखल घेईल असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. आमदार पाटील म्हणतात की, महसूलमंत्र्यांनी शासनाची २० एकर जमीन बळकावली. प्रत्यक्षात ती जमीन तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीला नियमानुसार दिलेली आहे. ती जमीन महसूलमंत्री खडसेंनी अल्पसंख्याक विभागाचे पॉलिटेक्निक कॉलेजसाठी शासनाला दान दिली. मुक्ताईनगर-कोथळी रस्त्यावरील शासनाकडून देण्यात आलेल्या सहा एकर जागेवर तालुका क्रीडा संकुल उभारले. कोथळी येथील लेवा पंच मंडळाची १०० एकर जमीन खडसेंच्या सूचनेनुसार कृषी पदवी महाविद्यालयासाठी शासनास दान केली आहे. हा त्याग करायला दानत लागते. मन मोठे असावे लागते. यामुळे अपूर्ण आणि पुराव्याअभावी माहिती देणाऱ्या मुक्ताईनगरातील शिवसैनिकांना आमदार पाटलांनी प्रशिक्षण द्यावे, असा चिमटा भाजपने काढला आहे.
पुढील स्लाइड्वर वाचा सेनेचा इशारा...
बातम्या आणखी आहेत...