आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीच्या ढगफुटीचा अंदाज; भाजपचे प्रशिक्षण शिबिर रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा भाजपमधील माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थकांमधील नाराजीच्या ढगफुटीचा अंदाज अाल्याने पाल येथे अायाेजित करण्यात अालेले पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिर रद्द करण्यात अाले अाहे. हवामान खात्याने वर्तवलेला अतिमुसळधार पाऊस अाणि ढगफुटीच्या अंदाजाचे कारण त्यासाठी भाजपने पुढे केले अाहे. २९ ते ३१ जुलै राेजी हाेणारे हे शिबिर २५ अाॅगस्टनंतर अाता थेट मुंबईतच अायाेजित करण्याचे नियाेजन सुरू अाहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अाराेपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता. त्यानंतर जिल्हाभरात खडसे समर्थकांनी राजीनामा अस्त्र उपसले हाेते. गेल्याच महिन्यात पक्षाचे निरीक्षक रवी भुसारी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतदेखील खडसे समर्थकांनी खडसेंना पुन्हा मंत्रिपद मिळत नाही, ताेवर पक्षाचे काेणतेही काम करणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला हाेता. याच बैठकीत जिल्हाध्यक्षांसह खासदारांचे अाणि रवी भुसारींचेदेखील भाषण बंद पाडण्यात अाले हाेते. अधिवेशन काळात सभागृहातील खडसेंचे चाैथ्या रांगेतील स्थान, अामदारांच्या बैठकीतील अपमान यामुळे खडसे समर्थकांच्या नाराजीत भर पडली अाहे. त्या पार्श्वभूमीवर खडसे समर्थकांच्या नाराजीचा मूड बघता पाल येथील प्रशिक्षण शिबिर रद्द केले अाहे. देशभरात सुरू झालेल्या महाप्रशिक्षण शिबिरात अातापर्यंत राज्यातील जवळपास १० जिल्हे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव वगळता सर्वच जिल्ह्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले अाहे. जळगाव महानगरचे शिबिर पाटणादेवी येथे झालेे. जळगाव ग्रामीणचे प्रशिक्षण शिबिर अाता पालएेवजी २५ अाॅगस्टनंतर मुंबईतच घेण्याचे नियाेजन केले जात अाहे.

पाल येथील प्रशिक्षण शिबिरात भाजप ग्रामीणचे सक्रिय सभासद, भाजपचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, अामदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी असे २५० जण अपेक्षित हाेते. या शिबिराकडे जिल्ह्यातील विशेष रावेर लाेकसभा मतदारसंघातील खडसे समर्थक पाठ फिरवण्याच्या नियाेजनात हाेते. याची कुणकुण लागल्याने शिबिर रद्द करण्यात अाल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत गाेटात अाहे.

लवकरच नियाेजन
उत्तरमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे महाप्रशिक्षण पूर्ण झाले अाहे. जळगाव ग्रामीणची नवीन तारीख ठरवून लवकरच प्रशिक्षण शिबिराचे अायाेजन करण्याचे नियाेजन करू. प्रा.डाॅ. अस्मिता पाटील, प्रदेश सहसंयाेजिका, पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान.
नियाेजन काेलमडू नये,

म्हणून प्रशिक्षण रद्द
हवामानखात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला अाहे. पाल येथे व्यवस्था नसल्याने शिबिराला येणाऱ्यांचे हाल झाले असते. निवासी शिबिर असल्याने तीन दिवसांचे नियाेजन करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशिक्षण रद्द केले अाहे. माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थकांच्या नाराजीमुळे कार्यक्रम रद्द केलेला नाही. उदयवाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप ग्रामीण
बातम्या आणखी आहेत...