भुसावळ - जिल्हाभरात चर्चेत असलेल्या भुसावळ पालिकेच्या पाेटनिवडणुकीत दाेन्ही जागांवर भाजपचा विजय झाला. यामुळे शिवसेनेत असलेले माजी अामदार संताेष चाैधरी गटाला धक्का बसला अाहे. बाजार समितीत झालेल्या पराभवाचा वचपा भाजपने या निवडणुकीत काढला अाहे.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या सरळ लढतीत भाजपचे परीक्षित बऱ्हाटे यांनी हजार ४०० मते मिळवून शिवसेनेच्या वैशाली पाटील यांचा २६९ मतांनी पराभव केला. प्रभाग सहामध्ये भाजपच्या मेघा वाणी यांनी हजार १९२ मते मिळवून राष्ट्रवादीच्या भारती चाैधरी यांचा ७१० मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या पूनम बऱ्हाटे यांना फक्त ८२८ मते मिळाल्याने त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
परिवर्तनाची नांदी
भुसावळपालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबरमध्ये हाेण्याचे संकेत अाहेत. या पार्श्वभूमीवर पाेटनिवडणुकीकडे सेमी फायनल म्हणून बघितले जात हाेते. भाजपने दाेन्ही जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याने भविष्यातील परिवर्तनाचे संकेत मिळाले अाहेत. भाजपने ‘वन बूथ टेन यूथ’ या संकल्पनेनुसार काम केले.