आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Youth Morchya Strike Issue At Jalgaon, Divya Marathi

भाजयुमोचा हार; चर्चेला मतदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लोकसभा निवडणुकीत नावे डिलीट केल्याच्या मुद्यावर आक्रमक असलेल्या भाजयुमोतर्फे बुधवारी पुन्हा तहसीलदारांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत आंदोलन करण्यात आले. तर ज्यांची नावे वगळली त्यांना प्रशासनातर्फे लेखी उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत अर्ज करूनही यादीत नाव न आलेल्यांनी माझ्याशी चर्चा करावी, असे खुले आमंत्रण तहसीलदार गोविंद शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी व नंतर भाजप व भाजयुमो महानगरतर्फे निवेदन देऊनही शासनाने मतदार यादीतून नाव डिलीट केलेल्या तसेच त्यांना नाव वगळण्यासंदर्भात कोणत्याही नोटीस न दिलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी केली होती. महापालिका निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांची कोणत्याही सुचनेशिवाय नावे वगळल्याची कारणमिमांसा केलेली नाही. तसेच भाजपतर्फे लोकसभा निवडणुकीपूर्वी नव्याने मतदार होणार्‍या सहा हजार नागरिकांचे अर्ज तहसील कार्यालयात जमा केले होते. परंतु त्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली नसल्याचे उघडकीस आल्याने बुधवारी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व भाजयुमो महानगराध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता आंदोलन केले. या वेळी तहसीलदार कार्यालयात येत नसल्याने तसेच कर्मचारी व अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या खुर्चीला हार घालत निषेध नोंदवला. या वेळी नितीन इंगळे, महेश जोशी, प्रशांत फाळके, धिरज सोनवणे, गणेश माळी, जुगल लुल्ला, कैलास पटेल आदींचा समावेश होता.