आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP's Councillor Prithviraj Sonawane Received Threat

भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणेंना धमकी, गोविंद पानसरेंप्रमाणे कृतीचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या सभागृहात नवखे असतानाही दोन वर्षांत विविध विषय मांडून चर्चेत आलेले भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांना नुकतीच जीवे मारण्याची धमकी आली आहे. बंद पाकिटात वृत्तपत्रामध्ये छापून आलेले शब्दांचे कात्रण कापून धमकीपत्र तयार केले आहे. यात कॉ. गोविंद पानसरे यांच्याप्रमाणे कृती करण्याचा इशारा दिला आहे. रामानंद पोलिस ठाण्यात त्यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

भाजपचे नगरसेवक सोनवणेंच्या आदर्शनगरातील दुकानात मे रोजी दुपारी १.३० ते वाजेच्या सुमारास पोस्टमनने बंद पाकीट आणून दिले. त्यात एक पत्र निघाले असून त्यावर वेगवेगळ्या वृत्तपत्रात छापून आलेले वाक्य शब्दांचे कात्रण तयार करून धमकीपत्र तयार करण्यात आले आहे. हे पत्र मे रोजी पोस्टात टाकण्यात आले आहे. पत्रात ‘तुम्ही आहात का नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, बरेच शिकावे लागेल, प्रश्न लवकरच सोडवणार, गोविंद पानसरे नुसार कारवाई होणार, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणेंची अमर कथा इशारा,’ असे लिहून खाली पासपोर्ट फोटो चिकटवला आहे. धमकीपत्रामुळे धास्तावलेले सोनवणे दोन दिवसांनंतर सोमवारी घराबाहेर निघाले. नगरसेवक रवींद्र पाटील यांच्यासोबत दुपारी रामानंद पोलिस ठाणे गाठुन त्यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे.
महापालिकेची सतरा मजली इमारत उडवण्यासंदर्भात धमकीपत्र यापूर्वी आले होते. परंतु नगरसेवकाला धमकी देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. सोनवणेंना धमकी देणारे कोण? याचा शोध सुरू झाला आहे. पालिकेच्या सभागृहात वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न मांडल्याने त्यातून दुखावलेल्या व्यक्तीने तर हा प्रकार केला नसावा, असा अंदाज सोनवणे व्यक्त करीत आहेत.