आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आगामी जिल्हा परिषद पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपची बुधवारी दुपारी वाजता बैठक होत आहे. खडसेंच्या राजीनाम्यानंतर जिल्हा भाजपची होणारी ही पहिलीच बैठक आहै. दरम्यान, जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्याचे टाळणारे भाजपचे आजी-माजी मंत्री बुधवारच्या बैठकीत एकत्र येतील की दांडी मारतील, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपच्या जिल्हा अाणि महानगरची बैठक बुधवारी दुपारी वाजता शहरातील बाबा हरदासराम मंगल कार्यालयात आयोजित केली आहे. या बैठकीसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह पक्षाचे खासदार, अामदार, जिल्हा परिषद सदस्य अाणि अन्य पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात अाले अाहे. अामदार खडसे अाणि मंत्री महाजन हे दाेन्ही नेते मंगळवारी मुंबईत हाेते.मात्र, मंत्री महाजन यांचा रात्री उशिरापर्यंत शासकीय दाैरा नव्हता. जळगावात असलाे तर बैठकीला नक्की येईल, असा निराेप त्यांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारी होणा ऱ्या बैठकीकडे विशेष लक्ष लागून आहे.
बातम्या आणखी आहेत...