आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP's Offer To Nationalist Congress Leader Digambar Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी काँग्रेसचे डिगंबर पाटलांना भाजपची आॅफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार डिगंबर पाटील यांना भाजपतर्फे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवण्याची आॅफर दिली गेली आहे. तसेच त्यांच्यासह अन्य काही पदाधिकारीही भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे डिगंबर केशव पाटील यांना जिल्हा बँक निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली पॅनलमार्फत लढवण्याची आॅफर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून देण्यात आली आहे. जिल्हा बँकेत डी.के.पाटील यांना उमेदवार करून खडसे यांच्याकडून एकाच दगडात दाेन पक्षी मारले जाण्याची शक्यता आहे. खासदार ईश्वरलाल जैन यांच्याबराेबर गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी डी.के.पाटील यांचा भाजप प्रवेश खडसेंसाठी फायदेशीर ठरणार आहे. डी.के.पाटील भाजपत आल्यास तालुक्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना विराेधकच राहणार नाही. त्यामुळे भाजपत त्यांना प्रवेश देण्यास गिरीश महाजनही अनुकूल आहेत. डी.के. पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती.

भाजपकडून संपर्क
भाजपनेत्यांतर्फे आपणास जिल्हा बँक निवडणूक लढवण्यासाठी संपर्क साधला आहे. परंतु आपण पक्ष साेडणार नाही. मतदारांच्या काैलाचा सन्मान करून थांबण्याचा निर्णय आपण घेतला आहे. म्हणून ठेंगे सोसायटीही लढायची आपली इच्छा राहिली नाही. डिगंबरपाटील, संचालक, जेडीसीसी