आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅक कोब्रासह 11 पिल्ले आढळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - शहरातील आसारामनगरातील एका घराच्या बाहेरील आडोशातून कोब्रा जातीचा साप व 11 पिल्ले आढळल्याने गुरुवारी खळबळ उडाली. भुसावळ येथील सर्पमित्र अँलेक्झांडर प्रेसडी यांनी सापाला पिल्लांसह सुरक्षित पकडले. या सापांना यावल अभयारण्यात सुरक्षित ठिकाणी सोडले जाणार आहे.
गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील आसारामनगरातील रहिवासी विक्रम अमरसिंग राजपूत यांच्या घरालगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या खालील भागात साप शिरताना त्यांच्या आई शांताबाई राजपूत यांच्या निदर्शनास आले. विक्रम राजपूत यांनी तत्काळ या प्रकाराची माहिती सर्पमित्र प्रेसडी व त्यांचे मित्र कुणाल शेजवळ यांना दिली. घटनास्थळी कोब्रा जातीच्या सापासह एकूण 11 पिल्ले आढळली. सापासह पिल्लांना सुरक्षित पक डण्यात आले.
पकडण्यात आलेला कोब्रा मादी प्रजातीचा असून त्याचे वय अंदाजे 14 ते 15 वर्षे आहे. तर पिल्लांचे वय एक ते दीड महिना आहे. कोब्रा एकाच वेळी 17 अंडी घालू शकतो. त्यामुळे परिसरात आणखी पिल्ले आढळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सर्पमित्र अलेक्झांडर प्रेसडी यांनी दिली.