आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्‍या जीवाची हत्‍या, नरबळीच्या संशयावरून पुजार्‍याची चौकशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- अर्भकाच्या मृत्यूमागे नरबळीचा संशय व्यक्त होत असल्यामुळे धुळे शहर पोलिसांनी सोमवारी शहरातील शिवाजी रोडवरील मंदिरातील पुजार्‍याकडे चौकशी केली. चौकशीला पुजार्‍याने सहकार्य केले असले तरी असला प्रकार घडला नसल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नदीपात्राजवळील कालिकादेवीच्या मंदिरापासून काही अंतरावर नदीपात्रात शरीररहित अर्भकाचे शिर आढळून आले होते. हा प्रकार बुधवारी (दि.18) उघडकीस आला होता. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असला तरी अर्भकाच्या मृत्यूमागे घातपात आणि नरबळीची शक्यता वर्तविली जात होती. अर्भकाच्या शिराची गुरुवारी (दि. 19) जिल्हा रुग्णालयात तपासणी झाली होती. वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी घातपाताची शक्यता वर्तविली होती. शिवाय शिर धारदार शस्त्राने वेगळे केले असावे, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांचा तपास नरबळीच्या दिशेने सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी धुळे शहर पोलिसांचे पथक सोमवारी सकाळी कालिकादेवी मंदिराजवळ गेले. नदीपात्र व परिसरात पुन्हा शोध घेऊन पोलिसांनी पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंदिरातील पुजार्‍याची भेट घेऊन चौकशी केली. घटनेच्या दिवशी अथवा त्या काळात परिसरात कोणाला संशयास्पदरीत्या फिरताना पाहिले का ?, मंदिर अथवा नदीपात्रात अर्भकाला घेऊन कोणी आले होते का ?, अर्भकाचा रडण्याचा आवाज कानावर आला होता का ? किंवा कोण्या भाविकाने तसा ऐकला असल्यास माहिती आहे का ? आदी प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.