आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवापूरच्या व्यापाऱ्याकडे सापडले १४ लाखांच्या जुन्या नोटांचे बंडल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदूरबार - नवापूर येथील खान ऑटो शोरूमचे संचालक अहमद खान सईद खान पठाण यांना १४ लाख रुपयांच्या रोख रकमेसह शुक्रवारी जयपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी पकडले. राजस्थान पोलिसांनी या बेहिशेबी रकमेची चौकशी सुरू केली आहे. खान यांना चाैकशी करुन तूर्त साेडून देण्यात अाल्याची माहिती अाहे.

अहमद खान यांच्याकडील रक्कम जयपूरला बँकेत जमा करण्यासाठी आणली आहे. सदर रक्कम जयपूर न्यायालयात सादर केली जाणार आहे. खान यांना हिशेब सादर करता अाला नाही तर ही रक्कम सरकार जमा होईल. खान यांनी एवढी मोठी रक्कम कोठून आणली याविषयी तपास सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...