आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीवर स्वच्छतागृहात केले ब्लेडने वार; मुक्‍ताईनगर येथील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर – शहरातील जे. ई. स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात एका विद्यार्थिनीवर स्कार्फ बांधलेल्या तीन ते चार तरुणांनी स्वच्छतागृहात ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली.
संबंधित विद्यार्थिनी दुपारी १२ ते १२.३० वाजतादरम्यान आपल्या दोन मैत्रिणींसोबत कनिष्ठ महाविद्यालयातील स्वच्छतागृहात गेली होती. तेथे चेह-याला स्कार्फ बांधलेल्या तीन ते चार तरुणांनी तिच्यावर हल्ला केला. त्यात विद्यार्थिनीच्या बोटावर, उजव्या हाताच्या दंडाजवळ ब्लेड लागले.
त्यामुळे ती ओरडतच बाहेर आल्यावर अन्य दोन तरुणीदेखील भेदरल्या. हल्ल्यानंतर संबंधित तरुणांनी पलायन केले. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांना माहिती मिळताच निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी जे. ई. स्कूल गाठून चौकशी केली. तसेच घटनास्थळी पाहणी केली असता पोलिसांना गुलाबी रंगाची शाई असलेली एक बाटली आढळून आली. मुलीच्या बोटांना स्केच पेनची लाल रंगाची शाई लागल्याचे दिसल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केल्याची माहिती चंदेल यांनी दिली. जखमी िवद्यार्थिनीवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
भीतीचे वातावरण
गेल्याआठवड्यात काळ्या रंगाच्या ओमनीतून आलेल्या दोघांनी शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या पालकांना सोमवारच्या घटनेमुळे हादरा बसला असून भीतीचे वातावरण आहे.